Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : विशेष पोलीस अधिकाऱ्याने वाचवले माय -लेकीचे प्राण…

Spread the love

शहानूर मियाँ दर्ग्याजवळील संग्राम नगर उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या रेल्वे रूळावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने  आपल्या आठ वर्षीय मुलीसह आलेल्या ४५ वर्षीय महिला आली होती . या महिलेला रेल्वे रुळावर बसल्याचे पाहताच या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांच्यासह देवनागरी भागातील महिलांनी पुढे येऊन या महिलेचे आणि  तिच्या आठ वर्षाच्या मुलीचे प्राण वाचवून तिला तत्काळ जवाहर नगर पोलिसांच्या स्वाधीन केले.  यापूर्वीही विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील आणि त्यांच्या देवनागरी भागातील स्वयंसेवी कारकर्त्यांनी अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे तर रेल्वे अपघातात जखमी झालेल्या अनेकांना तातडीची आरोग्य विषयक मदत दिली आहे.

काल घटना बुधवारी हि घटना घडली. सायंकाळी  सव्वा पाच वाजेच्या सुमारास  एक पंचेचाळीस वर्षे वयाची महिला आपल्या आठ वर्षीय मुलीसोबत संग्राम नगर रेल्वे रूळावरून जात होती. त्याच काळात चिकलठाणा येथून रेल्वे इंजिन हाॅर्न देत होता. ही घटना विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिली. हे सर्व जणांनी महिला आणि लहान मुलीला रूळावरून बाजूला बसविले. सदर महिला रडत होती. यामुळे देवानगरी भागातील महिला पुढे आल्या. त्यांनी महिलेला व तिच्या मुलीला बाजूला नेऊन विचारणा केली. तेंव्हा तिने सांगितले कि , काही दिवसापूर्वी मोठ्या मुलीचे लग्न केले. नवराही नाही. काही हजाराचे कर्ज झाले. घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याचे तिने सांगितले. देवानगरी च्या नागरिकांनी पैसे जमा करून देण्याचे सांगितले. तसेच शहानूर वाडीत कमी भाडे असलेले घर देण्याचे सांगितले. मात्र महिलेने नकार दिला आणि  तीने पुन्हा जीव द्यायला येईल. असे सांगितल्याने जवाहरलाल नगर पोलिस ठाण्यात फोन केला. काही वेळेत टु मोबाईल व्हॅन आली. शेवटी जवाहर नगर पोलिसांच्या हवाली महिलेला केलं. जवाहर नगर पोलिस ठाण्याचे संतोष पाटील यांनी व महिला कर्मचारी यांनी महिलेची अडचण समजून घेत, तीला समजावून सांगितले. तीला तिच्या घरी पाठवून दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!