Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbiNewsUpdate : संतापजनक : अरे रे काय हे ? महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग….

Spread the love

सर्वत्र लोक कोरोनाच्या संकटाशी मुकाबला  करीत असताना काही विकृत लोक सुधारायला तयार नाहीत याचीच प्रचिती येणाऱ्या संतापजनक घटना घडत आहेत . कोरोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याची घटना मुंबईत घडली आहे. सदर महिला हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टला जात असताना धावत्या लोकल ट्रेनमध्ये हि  घटना घडली असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. बोरिवली आणि कांदिवली रेल्वे स्थानकांदरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास धावत्या लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली.

या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली  असून रामेश्वर असे या तरुणाचे नाव आहे. याआधीही त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. आरोपी तरुणाकडे रेल्वेने प्रवास करण्याचे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नव्हते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा आहे. सदर महिला  आरोग्य कर्मचारी गोरेगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरीला असून रात्रपाळीचा ती  जात होती. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान ट्रेन थांबली असता, आरोपी तरुण डब्यामध्ये चढला आणि  त्याने सादर महिलेचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित नर्स बोरिवली स्थानकात उतरली आणि तिने रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. सदर आरोपी तरूण दहीसर स्थानकात उतरला तेंव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला होता. त्याच्याबाबत माहिती मिळताच  रेल्वे पोलिसांनी सापळा रचून त्याला तत्परतेने अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या. तिन्ही मार्गावरील उपनगरी रेल्वेस्थानकांमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसून आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!