Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ताजी बातमी : आमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न , विधानसभा अध्यक्ष काढत आहेत समजूत….

Spread the love

कोरोना काळात ना पैसा मिळाला ना काम . आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही . मग जागून काय फायदा आमच्या मृत्यू नंतर तरी आम्हाला न्याय द्या असे सांगत शिक्षकांच्या मागण्यांसाठी एका शिक्षकाने आज मुंबईतील मंत्रालय परिसरातील आकाशवाणी आमदार निवसाच्या एका इमारतीवर चढून या शिक्षकाकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून हि माहिती मिळताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व पोलिसांसह अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी  उपस्थित झाले आहेत. या शिक्षकाची सर्वोतोपरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हा शिक्षक ऐकण्याचा मनस्थित नसल्याचे दिसत आहे.

गजानन खैरे असे या शिक्षकाचे नाव असून  नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे  ते संस्थापक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी म्हटले आहे कि ,  कोरोना काळात आम्हाला काम मिळाले नाही, शिवाय पगार देखील मिळालेला नाही. कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही. आता मी खूप थकलेलो आहे. जिवंत असताना मला न्याय मिळाला नाही, किमान मेल्यावर तरी मला न्याय मिळू द्या, असे या शिक्षकाकडून वारंवार सांगितल्या जात आहे.  या शिक्षकांची समजूत काढताना नाना पटोले म्हणाले की, मी या विषयाबद्दल एक बैठक बोलावली होती. परंतु कोरोना काळात निर्णय झाले नाहीत. तुम्ही खाली उतरा उद्याच्या उद्या तोडगा काढतो. केवळ तुम्हीच नाहीतर अन्य शिक्षकांना देखील आपण मदत करू. परंतू तुम्ही असे टोकाचे पाऊल उचलू नका. मी तुमच्यासह सर्वांना न्याय मिळवून देतो असे, त्यांनी या शिक्षकाला आश्वासन दिले आहे. मी वर येतो आपण तिथेच चर्चा करू असे देखील पटोले यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!