Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शेंदूरवादा शेतवस्तीवर दरोडा, चिमुकल्याला चाकू लावत महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडले…

Spread the love

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी..

कोरोनामुळे पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांकडून दरोडा घातल्याचा पोलिसांचा कयास

औरंगाबाद : लघुशंकेसाठी घराचा दरवाजा उघडताच घराबाहेर पाळत ठेऊन बसलेल्या सात-आठ दरोडेखोरांनी घराचा ताबा मिळवत पिता-पुत्राला बेदम मारहाण केली.व तीन वर्षीय चिमुकल्याला चाकू लावत घरातील महिलेच्या अंगावरील दाग-दागिने ओरबाडले. 20 हजार रुपये रोख व सोने असा सुमारे 50 हजाराचा ऐवज लुटण्यात आला. दरोडेखोरांच्या मारहाणहीत पिता-पुत्र दोघे जखमी झाले.ही घटना आज पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास वाळूज जवळील शेंदूरवादा शेतवस्तीवर घडली.या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे दोन पथके,वाळूज पोलिसांची दोन पथके व पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज औद्योगिक पोलिसांचे एक पथक आरोपींच्या तपासासाठी कार्यरत आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली. गुलाब बनेखा सय्यद वय-51, रियाज गुलाब सय्यद वय-28 (दोन्ही रा.शेंदूरवादा वस्ती) अशी जखमी पिता-पुत्राची नावे आहेत.

या घटने प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, सय्यद परिवार हे शेतकरी परिवार असून दिवसभराचे काम आटोपून रात्री 10 च्या सूमरास घरातील सर्व सदस्य दार बंद करून झोपले होते.मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गुलाब सय्यद हे लघुशंके साठी झोपेतून उठले व घराचा दरवाजा उघडताच आधी पासून दबा धरून बसलेल्या सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने लाठ्या-काठ्या चाकू घेत घरात प्रवेश करून घराचा दरवाजा बंद केला.व दोन ते तीन दरोडेखोरांनी गुलाब सय्यद आणि त्यांचा मुलगा रियाज ला मारहाण करण्यास सुरुवात केली तर इतर दोघे आतील खोलीत गेले व त्यांनी प्रसूतीसाठी वडिलांच्या घरी आलेल्या मुलीच्या तीन वर्षीय चिमुकल्याला उचलले व त्यास चाकू लावून आतील खोलीत झोपलेल्या सय्यद यांच्या पत्नी शकीलाबाई, सून यासिन व मुलगी हिना यांना आरडाओरड केल्यास मुलाला जीवे ठार मारू असे धमकावले.व त्यांच्या अंगावर असलेले सोने ओरबाडले. मुलगा दरोडेखोरांच्या तावडीत असल्याने तिन्ही महिलांनी कोणताही विरोध केला नाही. दरोडेखोरांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले. त्यांना रोख 20 हजार रुपये मिळाले तो ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले.काही वेळा नंतर भेदरलेल्या महिला समोरील घरात आल्या नंतर पिता-पुत्र दोघेही जखमी अवस्थेत दिसताच महिलांनी आरडाओरड केली.आवाज ऐकून परिसरातील शेतकरी तेथे आले.या बाबत पोलिसांना माहिती देताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दोन्ही जखमींना तातडीने बिडकीन च्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले.सुरवातीला तेथील डाॅक्टरांनी उपचार करण्यास टाळाटाळ केली.पण पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी बिडकीन पोलिसांच्या मदतीने जखमींवर उपचार केले.जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती बिडकीनच्या शासकिय रुग्णालयातील डाॅक्टरांनी पोलिसांना दिली.
—————————-

दरोडेखोरांनी पुन्हा डोकेवर काढले..

वाळूज गंगापूर आणि वैजापूर या भागात दरोडेखोरांचा मोठा हौदोस होता.मात्र तत्कालीन शहर-ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने एकमेकांची मदत समन्वय घडवून आणत दरोडेखोराच्या अनेक टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्या नंतर वाळूज-गंगापूर भागातील दरोड्यांचा घटनांना आळा बसला होता.मात्र पुन्हा आता या टोळीने डोके वर काढल्याचे दिसत आहे.
—————————–

कोरोना पॅरोलवर सुटलेले कैदी पोलिसांना बनले डोकेदुखी….

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने कैदी ना पॅरोल वर सोडण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर शेकडो कैदाना कोरोना लॉक डाऊन काळात पॅरोल वर सोडण्यात आले होते.या कैदाना हाताला काम धंदा नसल्याने व काही सराईत गुन्हेगार सवयीचे असल्याने त्यांनी पुन्हा घरफोडी,दुचाकीचोरी, शटर उचकटने, किराणा दुकान फोडणे, या सारखे कृत्य करीत आहेत.मात्र पुराव्या अभावी पोलिसांना त्यांना पकडणे शक्य होत नाही.हे कैदी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची कबुली वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!