Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशात पुन्हा २५ सप्टेंबरपासून कडक लॉक डाऊन ? जाणून घ्या काय आहे सत्य ?

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच अफवांचा बाजारही गरम आहे.  सोशल मीडियावर काही लोक हुबेहूब मॅसेज तयार करून व्हायरल करीत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढत आहे . असाच एक मॅसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असून त्यात २५ सप्टेंबरपासून ४६  दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या मेसेजमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) नावाने एक पत्र व्हायरल होत आहे.

या पत्रामध्ये 25 सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे नमूद होते. मात्र PIB ने हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. तसेच. व्हायरल होत असलेले हे पत्र बनावट असल्याची माहिती दिली आहे. १० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या बनावट आदेशात म्हटले आहे की, “कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि देशातील मृत्यूदर कमी करण्यासाठी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय व गृह मंत्रालय २५ सप्टेंबर, २०२० पासून ४६ दिवसांचे क़डक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे एनडीएमए जीवनाश्यक वस्तूचा साठा करून ठेवण्यासाठी ही पूर्वसूचना बजावत आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. PIBने असे ट्वीट केले आहे की, ‘असा दावा केला जात आहे की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कथितरीत्या जारी केलेल्या आदेशात त्यांनी 25 सप्टेंबरपासून देशभरातील लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. हा आदेश बनावट आहे. लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासाठी प्राधिकरणाने असे कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!