Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले २० हजार ४८२ नवे रुग्ण , ५१५ रुग्णांचा मृत्यू , १९ हजार ४२३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात  तब्बल ५१५ करोना मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृतांचा एकूण आकडा आता ३० हजारावर  गेला आहे. राज्याचा  सध्याचा मृत्यू दर २.७७ टक्के इतका आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी , मृत्यूंचे वाढते प्रमाण हा राज्यासाठी चिंतेचा विषय बनला असून  राज्यात करोना संसर्गाचा कहर कायम आहे. राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा १७ हजार ६६ पर्यंत खाली आला होता. तर राज्यात आज तब्बल २० हजार ४८२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे आज १९ हजार ४२३ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७०.६२ टक्के इतके आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत ५४ लाख ९ हजार ६० जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १० लाख ९७ हजार ८५६ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण एकूण चाचण्यांच्या २०.२९ टक्के इतके आहे. एकूण रुग्णसंख्या सध्या ११ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली असली तरी त्यात २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. करोनाने आतापर्यंत एकूण ३० हजार ४०९ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर ३७७ रुग्ण अन्य कारणांनी दगावले आहेत.

राज्यातील शहरांपैकी पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असून  पुणे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आजचा आकडा ८० हजार १५२ इतका असल्याचे वृत्त आहे. मुंबईत आजचे १५८५ रुग्ण वगळता गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन हजारावर नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यापेक्षा अधिक झाली आहे. मुंबई शहर व उपनगरात मिळून सध्या ३० हजार ९३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा २९ हजार २३९ इतका झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!