Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSRDeathCase : सुशांत -रियाच्या निमित्ताने अंमली पदार्थाची विक्री करणारे मोठे रॅकेट एनसीबीच्या जाळ्यात

Spread the love

अंमली पदार्थांची तस्करी आणि व्यापार करणाऱ्या सातही दलालांना नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने  रविवारी अटक केली. मुंबई आणि गोव्यात एकाचवेळी केलेल्या कारवाईत एनसीबीचे सह संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने या सात दलालांना शनिवारी ताब्यात घेतले होते. रात्रभराच्या चौकशीनंतर रविवारी त्यांना अटक करण्यात आली. अभिनेता सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्ती ही भाऊ शौविक व सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडामार्फत अंमली पदार्थ मागवून ते सुशांतसिंहला देत होती, असे प्रारंभी सीबीआय आणि त्यानंतर एनसीबीच्या तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती देताना एनसीबी मुंबई क्षेत्राचे सह संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, ‘हे सातही जण चरस व गांजाचा पुरवठा करणारे आहेत. त्यांच्यापैकी करमजित हा चरस व गांजाचा पुरवठा करणारा मुंबईतील सर्वात मोठ्या दलालांपैकी एक आहे. करमजित सातत्याने सुशांतसिंह, रिया व शौविकला अमली पदार्थांचा पुरवठा करीत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळेच अधिक तपासासाठी या सर्व सात जणांना अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!