NashikNewsUpdate : न नाटकाचा एंटरटेनमेंट प्रस्तूत स्वगत स्पर्धा २०२० : मिनोरू, वरद , चैताली , माधुरी पुरस्काराचे मानकरी

वरद पूरंदरे, पूणे चैताली जाधव, पूणे माधूरी कावरे, अमरावती प्रणव शहा, पुणे
नाशिक येथील “न नाटकाचा एंटरटेनमेंटने राज्यातील नाटयवेड्यांसाठी पौराणिक नाटकातील कुठल्याही भूमिकेवर आधारित राज्यस्तरीय ” स्वगत स्पर्धा २०२०” आयोजित करण्यात आली होती.
दि. २ सप्टे. २०२० ते १२ सप्टे.२०२० या दरम्यान आयोजित य स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २८ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. यात उत्तेजनार्थ पारितोषके माधूरी कावरे अमरावती व चैताली जाधव पूणे यांनी पटकावले. द्वितीय पारितोषक वरद पूरंदरे पूणे यांना तर प्रथम पारितोषक पटकावित औरंगाबादच्या मिनोरु गाडे या स्पर्धेच्या विजेता ठरल्या. तसेच ही स्पर्धा यूट्यूब वरुन प्रसारीत करण्यात आल्यामूळे पुण्याचे प्रणव शहा यांच्या व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरून परतिसाद दिला यामूळे स्पर्धेचे प्रेक्षक पसंतीचे पारितोषक त्यांना मिळाले. सर्व स्तरातून या विजेत्यांचे अभिनंदन होत आहे. या स्पर्धेचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष योगेश म्हेत्रजकर, उपाध्यक्ष संदिप कनके, सचिव तेजस बिल्दीकर यांनी केले होते. तर या स्पर्धेच्या बक्षिसांचे प्रायोजक श्वेताक्षू एंटरटेनमेंट, नाशिक, के.टी.एच.एम. महाविद्यालय नाशिक तसेच पंकज साले , नांदेड हे होते. तसेच महेश म्हेत्रजकर, विशाल मुंडे, विनोद आघाव यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या. या स्पर्धेचे परिक्षण प्रा. डॉ. जयंत शेवतेकर , विभाग प्रमूख नाट्यशास्त्र विभाग डॉ. बा.आं.म. विद्यापीठ व प्रा. एन. गरूड विभाग प्रमूख नाट्यशास्त्र विभाग स.भू. महाविद्यालय यांनी केले . यासाठी प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे विभाग प्रमूख लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ यांचे मार्गदर्शन लाभले