AurangabadNewsUpdate : ३० किलो चांदीची अवैध वाहतूक, औरंगाबादच्या व्यापार्‍यांना ताब्यात घेऊन सोडले,जालना पोलिसांची कारवाई

Spread the love

औरंगाबाद – कुंभारवाड्यातील दोन सराफ व दोन ड्रायव्हर यांना ३०किलो चांदीची अवैध वाहतूक करतांना चंदनझिरा पोलिसांनी आज सकाळी ११च्या सुमारास नागेवाडी टोल नाक्यावर पकडले.त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करुन कोर्टात तारखेला हजर राहण्याची समज देऊन सौडलै.
प्रविण नंदलाल भोम (३७) रा.कुंभारवाडा, मनोज ओमप्रकाश वर्मा(४८) रा.देवानगरी, अस्लमखान मसुदखान(५०) रा.बेगमपुरा, सय्यद फारुक सय्यद हमीदोद्दीन(३२) अशी आरोपींची नावे आहेत.
वरील आरोपी ३०किलो चांदी घेऊन शहरातून नांदेड ला चालले होते. खबर्‍याने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली होती.पण तो पर्यंत व्यापार्‍यांची गाडी जालना पोलिसांच्या हद्दीत पोहोचली. त्यामुळे पोलिस निरीक्षक शामसुंदर कवठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद बोंडले यांनी नागेवाडी टोल नाक्यावर आरोपींच्या वाहनाची तपासणी केली. गाडीच्या डिक्कीत असलेल्या चांदीचा तपशील व्यापार्‍यांना देता आला नसल्यामुळे कारवाई केली असल्याचे चंदनझिरा पोलिसांनी सांगितले

Leave a Reply

आपलं सरकार