Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticaOfMaharashtra : बिहारच्या रणभूमीवरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर डागली तोफ

Spread the love

भाजपचे बिहारचे प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बिहारच्या निवडणूक रानभुमीवरून तोफ डागली आहे. माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथीत मारहाण प्रकरणावर भाष्य करताना , ही तर राज्यपुरस्कृत दहशत असल्याचा टोला लगावला आहे. बिहारमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले कि , “महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हा गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर ६ लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. जर अशा प्रकारे गोष्टी होत असतील तर अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झालं नव्हतं.”

महाराष्ट्रात खऱचं काश्मीरसारखं वातावरण होत आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे खूपच पुढारलेलं राज्य आहे. तिथली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे तिथे काश्मीरसारखी वैगरे स्थिती निर्माण होणार नाही.” सामना वृत्तपत्रातून कंगना रणौतवर केलेल्या टिपण्णीप्रकरणी पत्रकरांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “सामना हे शिवसेनेचं वृत्तपत्र असून यातून शिवसेनेचं म्हणणं मांडलं जातं. शिवसेनेला जर असं वाटत असेल की कंगना पाण्यात राहून मगरीशी वैर घेत आहे तर हा शिवसेनेचा अहंकार बोलत आहे. लोकांना अहंकार आव़डत नाही. जेव्हा सत्ता अहंकारी होते तेव्हा तिचं पतन होतं आणि राज्यात सध्या तेच दिसत आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!