Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अंतिम वर्षांच्या परीक्षार्थीना लोकल प्रवासाची परवानगी

Spread the love

मुंबईत अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सध्या बंद असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल धावत आहेत. विद्यार्थी ओळखपत्र तसंच हॉल तिकीट दाखवत लोकलने प्रवास करु शकणार आहेत. मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरु केली जाणार आहेत अशी माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेने इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन करताना प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!