Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आजपासून देशभरात धावतील ८० रेल्वे गाड्या , तिकीट आरक्षणास सुरुवात, मुंबई -मनमाडला धावणार तूर्त एक गाडी

Spread the love

देशभरात आजपासून देशात ८० नव्या रेल्वे गाड्या धावणार असून या गाड्यांसाठी १० सप्टेंबर पासून तिकीट आरक्षणास सुरुवात झाली आहे. आगामी काळ प्रमुख सणासुदीचा काळ असल्याने रेल्वेकडून विशेष ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. दसरा, दिवाळी, छठ पुजा सारखे सण पुढील काळात असल्याने या दरम्यान रेल्वेची संख्या वाढवण्याची मागणी होत असते. शिवाय, रेल्वेंमध्ये गर्दी देखील वाढत असते. हे बाब लक्षात घेता रेल्वेकडून ८० नव्या विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, कोलकाता, लखनऊ, पाटणा, दिल्ली या मार्गांवर विेशेष रेल्वे धावणार आहेत. सध्या विशेष रेल्वेच्या नावाने २३० एक्स्प्रेस रेल्वे चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाने कळविल्यानुसार तब्बल पाच महिन्यानंतर मध्य रेल्वेवरील पहिली राज्यांतर्गत विशेष सीएसएमटी-मनमाड रेल्वे गाडी शनिवारी १२ सप्टेंबरला धावणार आहे. सीएसएमटीहून गाडी क्रमांक ०२१०९ सायंकाळी १८.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मनमाडला रात्री २२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२११० मनमाडहून सकाळी ०६.०२ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला सकाळी १०.४५ वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव स्थानकात या गाडीला थांबा असेल. आसन प्रकारातील द्वितीय श्रेणीचे १७ डबे आणि तीन वातानुकीत आसन कार गाडीला असतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!