Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींचे जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज  कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे.  न्यायालयाने रियासह  शौविक यांच्यासह सर्व सहा आरोपींचा जामीन अर्जही  फेटाळून लावले त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वांना तुरुंगातच रहावं लागणार आहे. एनसीबीने अटक केल्यानंतर न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तिला आणि शौविकला जामीन मिळावा यासाठी कायदेशीर प्रयत्नही करण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जामीन अर्जावरील सर्व युक्तीवाद पूर्ण झाले होते. आज शुक्रवारी न्यायालयाने आपला निर्णय सुनावत रियासह शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, झैद विलात्र आणि अब्दुल बासित परिहार यांनाही जामीन मंजूर केला नाही.

रिया चक्रवर्तीला एनसीबीने  मंगळवारी अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने  तिला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या दिवशीही  न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता . विशेष न्यायाधीश जी.बी. गुरव यांनी गुरुवारी चक्रवर्ती भावंडं व विशेष सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधीशांनी या प्रकरणातील अन्य चार आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी केली. त्यानंतर न्यायालयाने खटला शुक्रवारपर्यंत तहकूब केला होता. दरम्यान यावर आज सुनावणी करत सर्व आरोपींचे  जामीन अर्ज फेटाळण्यात आले.

आपल्या युक्तिवादात रियाच्या वकिलाने रिया निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तिच्या चौकशी दरम्यात एकही महिला पोलीस अधिकारी नव्हती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार महिलेचे चौकशी ही पक्त महिला अधिकारी किंवा महिला कॉन्स्टेबल असतानाच केली गेली पाहिजे. मात्र रियाच्या बाबतीत असं काही झालं नाही. तसेच जामीन अर्जात रियाने स्पष्ट सांगितलं की, ती निर्दोष असून तिला या प्रकरणात जाणीवपूर्वक गुंतविण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!