Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : विज्ञानवादी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

Spread the love

आर्य समाजाचे नेते आणि विज्ञानवादी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन झालं असल्याचं वृत्त आहे. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र लीव्हर सोरायसीस या आजाराने त्यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावली होती. १९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९७७ मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान २०११ मध्ये त्यांनी लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते. स्वामी अग्निवेश हे बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही वेळापूर्वीच त्यांचं निधन झालं.

दरम्यानच्या काळात स्वामी अग्निवेश यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही  सहभागी झाले होते.  स्वामी अग्निवेश यांना नवी दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना लीव्हर सोरायसीस हा आजार जडला होता. १९८१ मध्ये त्यांनी बंधुता मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेची स्थापनाही केली होती. लीव्हर सोरायसीस या आजाराने त्यांना ग्रासलं होतं. एवढंच नाही तर शेवटी त्यांच्या मुख्य अवयवयांनी काम करणं बंद केलं. मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वरिष्ठ डॉक्टरांचं एक पथक त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतं मात्र त्यांची प्राणज्योत आज मालवली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!