Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात २४ हजार ८८६ नवे रुग्ण , राज्याने ओलांडला १० लाखाचा टप्पा

Spread the love

गेल्या २४ तासात  राज्यात तब्बल २४ हजार ८८६ इतक्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली असून  राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने आज १० लाखांचा टप्पा पार केला आहे.  आतापर्यंत राज्यात घेण्यात आलेल्या एकूण ५० लाख ७२ हजार ५२१ चाचण्यांमधून २० टक्के चाचण्यांचे अहवाल  पॉझिटिव्ह आले असल्याने हि संख्या संख्या १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे. आज १४ हजार ३०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७०.४ टक्के इतके आहे.

दरम्यान आजच्या आकडेवारीनुसार राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७० हजाराहून आधी झाला आहे. ७२ हजार ८३५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण एकट्या पुण्यात असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पुण्यातील अन्य आकडेही चिंता वाढवणारे आहेत. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या आज २ लाख २३ हजार ७१० इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४६ हजार १८२ रुग्ण बरे झाले असून ४६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील करोना बाधितांचे आकडेही वाढतेच आहेत. ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ हजार ६८८ इतकी झाली आहे.

याशिवाय मुंबईत रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार १७२ नवीन करोना बाधितांची भर पडली आहे तर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १ लाख ६५ हजार २८७ इतकी झाली असून आतापर्यंत १ लाख २९ हजार २४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर ८०६४ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या २७ हजार ६२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!