MumbaiNewsUpdate : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची बाधा

Spread the love

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून किशोरी पेडणेकर कोरोनाची  लक्षण दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी काळजी घेत अँटिजेन टेस्ट केली होती. ती आता पाँझिटिव्ह आली आहे. त्यांचे वय  58 वर्षे असल्याने त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांना बीएमसीच्या सेव्हन हिल्स या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्याची शक्यताही सांगितली जात आहे. काही दिवसांपूर्वीच  त्यांचे मोठे भाऊ सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्यावर  महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती. गेल्या एप्रिल महिन्यातही बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं.  क्वारंटाईननंतरत्या त्या काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या. दरम्यान मुंबईत कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत  भाजपने महापौरांच्या विरोधात ” भोजन ते कफन ” असे आंदोलन सुरु केले जाणार असून त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु आहेत . अर्थात या  प्रयत्नांना खीळ बसणार आहे . सभागृहाची बैठक तातडीनं बोलावण्याबाबत भाजपने  महापौरांना पत्रही  लिहिलं आहे.

Leave a Reply

आपलं सरकार