Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LaturNewsUpdate : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न , मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर राज्यातील मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. आज क्रांती मोर्चा समन्वयकांची नाशिकमध्ये  बैठक होत आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जात आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात याच मुद्द्यावरून एका उच्च शिक्षित तरूणाने चाकूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  किशोर कदम (वय 25) असे या तरुणाचे नाव असून तो  बोरगाव (ता. चाकूर) येथील रहिवासी आहे . तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.  या तरुणावर लातूरमधील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. “मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे माझे जीवन अंध:कारमय झाल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. ” असा मजकूर असलेली चिठ्ठी त्याने लिहिली होती. तसंच आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याने स्वत:चा एक व्हिडीओ बनवला. आरक्षणाच्या विषयातील अडथळ्यामुळे मी निराश आहे, असं सांगत त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या बाबतची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी स्वत:च्या शासकीय वाहनातून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणलं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी लातूर इथे पाठवण्यात आलं आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी बनवलेला व्हिडीओ, आणि लिहिलेली चिठ्ठी याबाबत त्याच्या वडील गिरीधर कदम यांना विचारलं असता, तो कालपासून व्यथित होता. त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं असावं असं सांगितलं. दरम्यान चाकूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!