Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : बीएमसीकडून कंगनाच्या घराची तोडफोड , न्यायालयाच्या आदेशाने कारवाई थांबवली …..

Spread the love

ट्विटर युद्धामुळे चर्चेत असलेल्या कंगना राणावतच्या जुहू येथील कार्यालयावर सुरु असलेली कारवाई न्यायालयाच्या आदेशाने थांबवण्यात आली आहे. दरम्यान कारवाईसाठी आणलेलं सर्व साहित्य घेऊन महापालिका कर्मचारी पुन्हा परतले आहेत. कंगनाच्या वकिलांनी कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली असून दुपारी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी होईपर्यंत कारवाई स्थगित करण्यात आली आहे. अभिनेत्री कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापली बाजू हायकोर्टात मांडतील.

आज सकाळीच मुंबई महापालिकेचे कर्मचारी कंगनाच्या कार्यालयाबाहेर धडकले होते. सुमारे दीड-दोन तास तोडकाम केल्यानंतर महापालिकेने कारवाई थांबवण्यात आली. या तोडकामाविरोधात कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर हे तोडक काम तूर्तास थांबवलं आहे. दरम्यान कोर्टाच्या आदेशानंतर तोडकाम करण्यासाठी कार्यालयात गेलेले महापालिकेचे कर्मचारी साहित्य घेऊन बाहेर आले असून जेसीबीही रवाना झाला आहे. कार्यालयातील तळमजल्यावर या पथकाने हे तोडकाम केलं.

कंगनाचे ट्विटर युद्ध चालूच

या कारवाईची माहिती मिळताच कंगनाने एका पाठोपाठ एक अनेक ट्विट सुरूच ठेवले असून पुन्हा एकदा तिने मुंबईची तुलना  थेट पाकिस्तानशी  केली आहे. आज मुंबई महापालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई करण्यास सुरुवात केली. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईचे फोटो ट्वीट करत कंगनाने ‘पाकिस्तान’ असं कॅप्शन दिले असून   कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असं म्हटलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असा हॅशटॅगही तिने दिला आहे.

माझ्या घऱात कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही – कंगना

कंगनाने ट्विट करत आपल्या घऱात कोणतंही अनधिकृत बांधकाम नसल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये कंगनाने लिहिलं आहे की, “माझ्या घरात कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही. तसंच सरकारने ३० सप्टेंबपर्यंत सर्व प्रकारच्या तोडक कारवाईवर बंदी आणली आहे. बॉलिवूडकरांनो फॅसिझम असं असतं”.

भाजपची बीएमसीवर टीका तर  आठवलेंचे संरक्षण

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाच्या बंगल्याच्याच्या तोडफोड प्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत एकामागोमाग प्रश्न विचारले आहे. बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहिले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. दरम्यान कंगना आज मुंबई विमातळावर दाखल होणार असून यावेळी आरपीआय तिला संरक्षण देईल अशी घोषणा रिपाइचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे. ४ सप्टेंबरला रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला RPI संरक्षण देईल”.

बीएमसीची तुलना बाबराशी

दरम्यान कंगनाच्या जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेने ठेवला. त्यानंतर कंगनाला नोटीस बजावत अखेर बुधवारी सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्यासाठी तिच्या कार्य़ालयावर पोहोचले. या निमित्ताने कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली. कंगनाने २ ट्विट केले. “मणिकर्णिका फिल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेव बाबर… राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”, असं तिने ट्विट केलं. तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे काही निवडक फोटो पोस्ट करत त्यांना तिने ‘बाबर आणि त्याची सेना’ असं म्हटलं.

कंगनाकडून पुन्हा एकदा मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणून उल्लेख

मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केल्याने आधीच वाद निर्माण झालेल असताना कंगनाने पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केला आहे. कंगनाने पालिकेच्या कारवाईवर टीका करणारं ट्विट करत लिहिलं आहे की, मी कधीच चुकीची नसते हे माझे विरोधक वारंवार सिद्द करत असतात. याच कारणाने माझी मुंबई आता पाकिस्तानव्याप्त काश्मीर झालं आहे.

…तर कायमची मुंबई सोडून देईन, कंगनाचं गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावतचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचं सांगितलं आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ट्विट केलं असून आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचं आवाहन दिलं आहे. तसंच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु असंही ती म्हणाली आहे. कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय”. “मुंबई दर्शन घेण्यासाठी मी विमानतळाच्या दिशेने प्रवास करत आहे. यावेळी महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या संपत्तीजवळ बेकायेदशीरपणे कारवाई करण्यास सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी रक्त देण्यासाठीही तयार आहे, हे काहीच नाही. सर्व घेऊ शकता पण माझा उत्साह वाढत राहील,” असेही कंगनाने  म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!