Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मोदी सरकारने दिलेल्या कडेकोट संरक्षणात कंगना मुंबईत घरी पोहोचली….

Spread the love

“महाराष्ट्र किसी के बाप का नहीं, मै ९ सप्टेंबरको मुंबई आ रही  हूँ . क्या उखाडना है , उखाडलो …” असे आव्हानात्मक ट्विट करणारी  कंगना राणावत  मोदी सरकारची वाय प्लस सेक्युरिटी आणि मुंबई पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात अखेर मुंबईत दाखल झाली आहे.सुशांतसिंह प्रकरणात घराणेशाहीवरून वाद निर्माण केल्यानंतर अभिनेत्री कंगनानं हिनं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारवर टीका करणं सुरू केलं आहे. मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ सुरू आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असताना कंगना आता मुंबईत दाखल झाल्यानं वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांनी कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद देण्यात आली होती. शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र पक्ष प्रमुखांनी आंदोलन स्थगित करण्याच्या सूचना केल्या . दरम्यान कंगना विमानतळावरून  बाहेर पडली असून ती विशेष गाडीतून विरोधकांना चकवा देत मुंबईतील घराकडे रवाना झाली आहे. कंगना मुंबईत येताच तिला होम क्वॉरंटान करण्यात येणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं होतं. त्यामुळं आता बीएमसी कोणतं पाऊल उचललं याकडं सर्वांचच लक्ष लागलं आहे.

मुंबई वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाच्या पथकानं कंगनाच्या बंगल्याची पाहणी करून कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाई करून हातोडा चालवला आहे. दरम्यान या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देतोय असं मत व्यक्त केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि , “मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!