Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात २०१३१ नवीन रुग्णांची वाढ , ३८० रुग्णांचा मृत्यू , १३ हजार २३४ रुग्णांनी कोरोनावर मात

Spread the love

काल राज्यात नवीन कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सोमवारी १६ हजारांपर्यंत खाली आला असतानाच आज पुन्हा एकदा २० हजारपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली  आहे. गेल्या २४ तासांत २० हजार १३१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आणखी ३८० जणांचा करोनाने बळी घेतला आहे. राज्यात सोमवारचा अपवाद वगळता सलग तीन दिवस २० हजारावर नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी राज्यात २३ हजार ३५० रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला गेला होता. त्यानंतर हा आकडा काल सोमवारी १६ हजार ४२९ पर्यंत खाली आला होता  मात्र पुन्हा या आकड्यात वाढ झाली आहे. दरम्यान उपचार घेत असलेल्या रुग्णांची अॅक्टिव्ह रुग्ण एकूण संख्या आता २ लाख ४३ हजार ४४६ इतकी झाली आहे.

राज्यात आज ३८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या आता २७ हजार ४०७ इतकी झाली आहे तर इतर कारणांनी ३६३ रुग्ण दगावले आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या २.९ टक्के इतका आहे. आतापर्यंत राज्यात ४७ लाख ८९ हजार ६८२ इतक्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ९ लाख ४३ हजार ७७२ म्हणजेच १९.७ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १५ लाख ५७ हजार ३०५ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३८ हजार १४१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याचे सांगण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७१.२६ टक्के इतके आहे. आज १३ हजार २३४ रुग्णांनी करोनावर मात केली. या सर्वांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. पुण्यातील करोना साथीची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल ६२ हजार ८५९ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्या २ लाख ७४ हजार ३५ इतकी झाली आहे. पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यात सध्या २५ हजार ८५२ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका हद्दीत हाच आकडा २४ हजार ५६० इतका आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!