IndiaNewsUpdate : होम क्वारंटाईन असलेल्या महिलेवरच आरोग्य कर्मचाऱ्याने बलात्कार

Spread the love

केरळमध्ये रुग्णवाहिकेतच कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच  याच राज्यात होम क्वारंटाईन असलेल्या महिलेवरच बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका हेल्थ वर्करनेच हे कृत्य केल्याचं स्पष्ट झाल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिरूवनंतपूरम इथे एक महिला आपल्या घरीच क्वारंटाईन होती. महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला जास्त लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे महिलेला घरीच होम क्वारंटाईनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर  तिला हेल्थ वर्करने महिलेला घरी बोलावलं. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह देतो असं सांगून त्याने तिला घरी बोलावलं आणि तिच्यावर जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या हेल्थ वर्करला ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत.

आपलं सरकार