Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : महानायकसोबत लाईव्ह पाहा : कोरोना असूनही झाली गर्दी , राज्य विधान मंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ…

Spread the love

विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु झालं असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे 38 आमदार विधिमंडळाच्या या अधिवेशनाला गैरहजर राहणार आहेत.


राज्य विधी मंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशला प्रारंभ झाला असून पहिल्या सत्रात दिवंगत झालेल्या सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. या  पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, कर्मचारी, पत्रकार पोलीस कर्मचारी यांचे कोरोना रिपोर्ट पाहून ते नेगेटिव्ह असतील तरच त्यांना प्रवेश देण्यात येणार होता. तसं नियोजनही करण्यात आलं होतं. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवस असूनही अनेकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स आलेले नाही. त्यामुळे विधिमंडळ परिसरातील काउंटर्सवर सर्वांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यातील रिपोर्ट नेगेटिव्ह आले तरच त्यांना विधिमंडळात प्रवेश मिळणार आहे. परंतु, ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील त्यांच्याबाबत काय निर्णय घेण्यात येणार, हा प्रश्न अनुत्तर्णीत आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात कमालीचा संभ्रम पाहायला मिळाला. कारण अनेकांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल मिळाले नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल होताच, तेथे उपस्थित असलेल्या सर्व आमदरांनी त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. सर्व प्रकार ऐकून घेत अजित पवारांनी सर्व सिच्युएशन आपल्या हातात घेतली. सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेत अजित पवारांनी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना बोलावून घेतलं. तसेच सर्व आमदारांचे रिपोर्ट्स अद्याप का आलेले नाहीत, याबाबत विचारणा केली. तसेच काही आमदारांनी वैयक्तिक चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे जर त्यांच्याकडे त्या चाचण्यांचे अहवाल असतील आणि ते नेगेटिव्ह असतील, तर त्यांना आतमध्ये सोडा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

अधिवेशनात खबरदारी म्हणून प्रत्येक जणांची स्वॅब टेस्ट घेतली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ४१५ जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये सचिव मंत्री, विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जण असल्याची माहिती आहे. उर्वरित सर्वाधिक पॉझिटिव्ह टेस्ट आढळल्याची संख्येमध्ये मंत्रालय अधिकारी कर्मचारी विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांचे लोकदेखील असल्याची माहिती आहे. ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत अशा लोकांना विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होता येणार नाही आहे.

पावसाळी अधिवेशन आधी विधान भवनात  एकूण ४१५  स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी २१ जण  पॉझिटिव्ह आढळले तर पहिल्या दिवशी १७०० चाचण्या त्यामध्ये पॉझिटिव्ह ३७ जण आढळून आले. दोनही दिवसात आमदार कक्षात १४ जण तर अति महत्त्वाच्या कक्षात ७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकत नसल्याचं बहुतांश आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांना पत्र लिहून कळवलं आहे. काही आमदारांची वयाचं कारण देत अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितल आहे तर काही आमदारांनी विविध आजारावर उपचार घेत असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाला २५ टक्के आमदारांची अनुपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच, भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. हातात बॅनर घेऊन भाजप आमदार पायऱ्यांवर उपस्थित होते. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, अशी मागणी भाजप आमदारांच्या वतीने करण्यात आली. मराठवाड्यातील भाजप आमदरांनी ही मागणी केली. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांसमोर हात जोडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन थांबलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!