Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MubaiNewsUpdate : मुख्यंमत्री उद्धव ठाकरे पाठोपाठ शरद पवार , गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमक्यांचे फोन

Spread the love

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर फोनवरुन धमकी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले असल्याचे वृत्त आहे.  दरम्यान शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी  भारताबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. तर कंगना राणावत प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोनही त्यांना कालच आला असून हा फोन मात्र भारतातून आला आहे. दरम्यान गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. परंतु याबाबत गृहमंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान काल  केवळ मातोश्रीच नाही तर शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही धमकीचे फोन आल्याचे वृत्त टीव्ही माध्यमांनी दिले आहे. याप्रकरणी स्थानिक खेरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक कसून तपास करत आहेत. यासोबतच या प्रकरणाची माहिती सायबर पोलिसांना देखील देण्यात आली आहे. हा कॉल नक्की दुबईवरुन आला होता का? की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोणी खोडसाळपणा तर केला नाही ना? याची देखील माहिती घेण्यात येतं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!