वर्धा जिल्ह्यात मोटारसायकलला भीषण अपघात , तीन तरुणांचा चिरडून अंत , ओळख पटेना ….

Advertisements
Advertisements
Spread the love

वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग सहावर पहाटेच्या सुमारास तळेगाव येथील उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारासह 3 जण जागीच ठार झाले. यातील मृतांची ओळख अद्याप  पटली नाही. मात्र अपघातातील युवक बौद्ध धर्माचे प्रसारक असल्याचे कळते. पुढील तापस तळेगाव पोलीस करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेले तिघे जण हे महामार्गावर उशिरा रात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. जेवण केल्यानंतर ते पुढील प्रवासा करिता निघाले. हॉटेलपासून काही अंतर दूर गेले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.

Advertisements

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चक्काचुर झाली. अज्ञात वाहनाने इतक्या जोरात धडक दिली की, दुचाकी काही अंतर दूरपर्यंत फरफटत नेली होती. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातात मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह हे ओळखण्या परिस्थितीत नव्हते. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव (शाम.पंत) पोलीस घटना स्थळावर पोहोचले. तिघांनाही आर्वीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार