Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : नोकर भर्तीवर कुठलाही प्रतिबंध नाही , अर्थ मंत्रालयाचा खुलासा

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही रोजगार कमी होणार नाही असे स्पष्ट करताना केंद्र सरकारने म्हटले आहे की,  कोरोना व्हायरसच्या महासाथीमुळे सरकारी खर्चांवर नियंत्रण आणण्यासाठी काही नियम जारी केले असले तरी , सरकारी नोकरभरती वर कोणताही परिणाम होणार नाही. याबाबत अर्थ मंत्रालयाकडून जारी केलेल्या स्पष्टीकरणात सांगण्यात आले आहे की, सरकारी एजंसी उदा. एसएससी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डात पहिल्यांप्रमाणे भरती जारी राहिल. देशभरात कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या कहरात नोकरभरती रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावर अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान अर्थ मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी करीत हे स्पष्ट केले आहे की, भारत सरकारमध्ये रिकाम्या पदांच्या भरीतासाठी कोण्याताही नव्या भर्तीवर निर्बंध आणण्यात येणार नाहीत. मंत्रालयाने स्पष्ट केलं की, १ जुलै २०२० नंतर जर कोणतं नवीन पद तयार केलं गेलं आहे ज्यासाठी महसूल विभागाची मंजुरी घेण्यात आलेली नाही आणि यावर जर नियुक्तीझाली  नाही तर हे पद रिक्त ठेवण्यात येईल. मंत्रालयाकडून हेदेखील सांगण्यात आले आहे की, महसूल विभागाचे जे सर्क्युलर आहे ते पदांच्या निर्मितीच्या अंतर्गत प्रक्रियेशी संबंधित आहे आणि हे कोणत्याही प्रकारे भर्तीवर परिणाम होऊ देणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!