Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : निष्काळजीपणा न दाखवता जागरुक राहा, कोरोनाचं संकट आपण रोखू शकतो : मुख्यमंत्र्यांना विश्वास

Spread the love

महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने आव्हानात्मक आहेत. राज्यात ऑक्सिजनचं उत्पादन वाढविण्यात येणार आहे. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. लोकांनीही निष्काळजीपणा न दाखवता जागरुक राहावे. त्यामुळे कोरोनाचं संकट आपण रोखू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.  मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढत असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढवा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब , माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित आहो. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या. सार्वजनिक तर ठीक आहे पण वैयक्तिक स्वच्छतेला खूप महत्व देणे गरजेचे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे त्यादृष्टीने जागृती करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, आपण धारावी आणि वरळीत करून दाखविले, त्यासाठी आपले कौतुक झाले पण हुरळून न जाता ढिलाई न दाखवता अधिक जोराने काम करा. दिवसाला 1000 किंवा 1100रुग सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे हे निश्चित आहे.

मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीतजास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणणे असे आदेश काढावे लागतील. ट्रेकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे 20 नव्हे तर 30 संपर्क शोधणे आणि 48 तासांच्या आता त्या हाय रिस्क संपर्काची चाचणी करणे खूप आवश्यक आहे. कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत काही दुष्परिणाम दिसत आहेत मात्र हे दुष्परिणाम कोविडचे आहेत की जे आक्रमक औषधोपचार  केले आहेत त्याचे आहेत हेही पाहिले पाहिजे.पोस्ट कोविड उपचारही  तितकेच महत्वाचे आहेत. त्यासाठी चांगली व्यवस्था उभारा. औषध नसले तरी उत्कृष्ट रुग्ण सेवा आवश्यक आहे. यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो. नुसते बेडस, औषधे दिले म्हणजे आपण सुटलो असे नाही , रुग्ण सेवा चांगली पाहिजे. शिथिलता दूर करा, चूक शोधा आणि पाऊले टाका असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी वाढ होत आहेत. शनिवारी आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आढळली. 24 तासांमध्ये तब्बल 20 हजार 489  नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 312 मृत्यू झाला. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातल्या कोरोना रुग्णाची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!