Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : कंगना पिसाळली , ट्विटरवर टिव टिव सुरूच !! म्हणाली उखडो, मेरा क्या उखाडोगे…

Spread the love

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचे जेवढे दुःख कंगनाला आहे त्यापेक्षा काकणभर अधिक दुःख त्याच्या महाराष्ट्रातील फॅन्सलाही आहे पण सुशांतच्या मृत्यूचे निमित्त करून कंगना बॉलिवूड विषयीची आपली  भडास काढीत आहे असेच दिसत आहे . खरे तर तिच्या वक्तव्याला महत्व देणे तसेही उचित नाही पण जेंव्हा तिने मुंबई पोलिसांविषयी अनुद्गार काढले त्यामुळे तिच्या वक्तव्याचा समाचार घेणे लोकांना क्रमप्राप्त वाटले म्हणून बॉलिवूडपासून ते राजकारणी , समाजकारणी आणि थेट गृहमंत्र्यांनी तिची दखल घेत तिने असे बोलू नये असा सल्ला दिला आहे परंतु कंगना है के मानती नही , अशी तिची अवस्था झाली आहे . गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना  वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंह प्रकरणात घराणेशाहीवरून वाद निर्माण केल्यानंतर अभिनेत्री कंगनाने  मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारवर टीका करणं सुरू केलं आहे. मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ सुरू आहे.

आपल्या विरोधातील ट्विटला उत्तर देताना तर तिने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये आपली पातळी पूर्णतः सोडली आहे . आपल्या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे कि , किसी के बाप का नहीं है महाराष्ट्र, महाराष्ट्र उसी का है जिसने मराठी गौरव को प्रतिष्ठित किया है। और मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे? . ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली आहे. त्यावर  कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे.

आज सकाळी कंगनाने  ट्विट करत ‘मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा, असं थेट आव्हान दिलं होतं. कंगनानं केलेल्या या ट्विटनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर मोठी टीका होत आहे. शिवसेना नेत्यांनी तर  कंगनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा  घेतला आहे. राज्यातील विविध भागांत कंगनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर, मुंबईतील शिवसेना भवनासमोर महिला आघाडीनं कंगनाचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे. नाशिकमध्येही शिवसेना कार्यालयाबाहेर कंगनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर, युवा शिवसेनेने कोल्हापुरात निदर्शने करून तिचा निषेध केला आहे.

दरम्यान काही दिसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिहं याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका केली होती.’मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असं तिनं म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. ‘मुंबईत भीती वाटत असेल तर आणि कोणाला इतर राज्यांची सुरक्षा हवी असेल तर चंबूगबाळे आवरून निघून जावं,’ असं त्यांनी सुनावलं होतं. त्यावर कंगनानं कांगावा करत संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचं म्हटलं आहे. मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय,’ असं ट्वीट तिनं गुरुवारी केलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!