IndiaNewsUpdate : मोबाइल टॉवर्स प्रकरणात मोदी सरकारकडून मुकेश अंबानींच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींची डील , दूरसंचार खात्याची ब्रुकफिल्डला मंजुरी

Advertisements
Advertisements
Spread the love

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारने  ब्रुक फिल्ड सेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे. पीटीआयनं हे वृत्त दिलं असून टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्यानं ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ब्रुकफिल्ड ही कॅनडास्थित कंपनी असून देशभरातील १.३५ लाख मोबाइल टॉवर्सची विक्री या माध्यमातून होत असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

एक वर्षापूर्वी सदर प्रस्ताव सरकारपुढे विचारासाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला अर्थखाते, गृहखाते तसेच मध्यवर्ती बँकेने जुलैमध्ये मान्यता दिल्याचे वृत्त आहे.  मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगामध्ये याआधीही सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती. या उत्पन्नातून कर्जाचा बोजा कमी करणं व समूहाची मुख्य कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये हिस्सा वाढवणं हा अंबानींचा उद्देश राहिला आहे. या व्यवहारानंतर जिओ ही या नवीन कंपनीची ३० वर्षांसाठी टेनंट राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार