Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : नागरिकांनी निसंकोचपणे त्यांच्या सूचना मांडाव्यात : नूतन पोलिस आयुक्त निखील गुप्ता

Spread the love

चिरंजीव प्रसाद यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रशंसा

औरंंंगाबाद : नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणारे पोलिस दल असून नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, सुचना निसंकोचपणे मांडाव्यात असे आवाहन शहराचे नविन पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी केले आहे. पोलिस आयुक्त पदाचा पदभार शुक्रवारी (दि.४) स्वीकारल्यानंतर निखील गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी पोलिस आयुक्त तथा नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबाद शहरात यापूर्वी पोलिस उपायुक्त पदावर काम केले असल्याने शहराची  खडान-खडा माहिती आपल्याला असून गेल्या १५ वर्षाच्या काळात शहरात काही बदल झाले असल्याचे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. नागरिकांना चांगली व दर्जेदार सेवा पोलिसांच्या वतीने देण्यात यावी यासाठी भविष्यात काही बदल नक्कीच केल्या जातील असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. तसेच यापूर्वी उपायुक्त म्हणून काम केले असून आता पोलिस आयुक्त म्हणून काम करतांना अनेक जबाबदा-या वाढल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, माजी पोलिस आयुक्त तथा नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या चिरंजीव प्रसाद यांनी औरंगाबाद शहर हे माझ्या कायम स्मरणात राहील असे सांगितले. तसेच येथील अधिकारी व कर्मचारी चांगले असून अधिकाNयांत गुणवत्ता असून त्यांचे चांगले काम करण्याची क्षमता असल्याचे चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात औरंगाबाद शहराला चांगले शहर बनविण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, डॉ. राहुल खाडे आदींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!