Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneCoronaUpdate : पुण्याच्या माजी महापौरांना जिवंतपणी बेड मिळण्यास अडचण तर मृत्यूनंतर स्मशानभूमीत अडचण !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे शहराची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे कि काय अशी शंका निर्माण झाली आहे . काल कार्डियाक अँब्युलन्स वेळेवर न मिळाल्यामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असताना त्या पाठोपाठ पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांना तर ना वेळेवर कोविड रुग्णालयात बेड मिळाली ना मृत्यूनंतर स्मशानभूमीत जागा …  यावरून सर्वसामान्य रुग्णांची अवस्था काय असेल ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .

Advertisements

दत्ता एकबोटे  यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान करोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे. गरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे . कष्टकऱ्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे त्यांनी उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एसेम जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत असत.

Advertisements
Advertisements

दरम्यान  त्यांची  ज्येष्ठ कन्या  आणि तरुण मुलाचेही  कोरोनामुळेच निधन झाले आहे. एकबोटे यांना कोरोना झाल्याचे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला, पण त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळाले नाही. दरम्यान हे माहित झाल्यांनतर माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांनी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सुविधा उपलब्ध झाल्या आणि गांभीर्याने उपचार केले गेले खरे परंतु तोपर्यंत उशीर झाला होता अखेर मध्यरात्री बारा -सव्वा बाराच्या सुमारास त्यांनीं अखेरचा श्वास घेतला. मृत्यूनंतरही  त्यांच्या अंत्यसंस्कारात अनेक अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले परंतु  तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले परंतु तेथेही अडचणी आल्या अखेर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!