Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CrimeNewsUpdate : हॅण्डग्लोव्ह्ज घेताय ? सावधान !! वापरलेले हॅण्डग्लोव्ह्ज विकणारी टोळी जेरबंद , आरोपींकडून 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

नवी मुंबई पोलीसांनी कोरोना काळात वापरून टाकलेलय  नायट्राईल हॅण्डग्लोव्ह्जवर प्रक्रिया करून ते पुन्हा बाजारात विकणाऱ्या  टोळीला  जेरबंद केले आहे. नवी मुंबई बरोबर औरंगाबाद, बंगळुरु, कोचिन येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत आरोपींकडून 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी प्रशांत सुर्वे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर नवी मुंबईत आलेला हॅन्डग्लोव्ह्जचा पुरवठा औरंगाबाद, भिवंडी येथून झाला असल्याची माहिती दिली होती. दरम्यान क्राईम ब्रान्च टीमने औरंगाबादमध्ये जाऊन तपास केला असता तिथे 19 टन तर भिवंडी येथे 15 टन साठा सापडला. अधिक तपासामध्ये जुन्या हॅण्डग्लोव्ह्जचा माल बंगळुरु, कोचिन, हैदराबाद येथून आल्याची माहिती मिळाली.

दरम्यान गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमधून 4 टन हॅन्डग्लोव्ह्जचा साठा जप्त केल्यानतंर याचे धागेदोरे कोचिन, बंगळुरुपर्यंत गेले आहेत. कोरोना काळात वापरून फेकून दिलेल्या नायट्राईल हॅन्डग्लोव्ह्जचा पुनर्वापर करणारी टोळीला नवी मुंबई क्राईम ब्रान्चने बेड्या ठोकल्या आहेत. क्राईम ब्रान्च अधिकारी राहुल राख यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर छापा टाकला असता 4 टन जुने हॅण्डग्लोव्ह्जचा साठा पकडण्यात आला होता. जुन्या हॅण्डग्लोव्ह्जला धुवून परत विकणाऱ्या टोळीचे धागेदोरे दक्षिण भारतात मिळाले आहेत. बंगळुरु, हैदराबाद, कोचिन येथे छापा टाकत एकूण 48 टन हॅण्डग्लोव्हजचा साठा जप्त करण्यात आला आहे. वॉशिंग मशीन, ड्रायर्स, ब्लोअर असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवी मुंबईतून हॅण्डग्लोव्हज सप्लायर प्रशांत सुर्वे यांनी ज्या कंपनीला हॅन्डग्लोव्ह्ज पुरवले होते, ते जप्त करण्याचे काम सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!