Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : तीन महिन्यापूर्वी सापडलेले साडेतीन लाखांचे दागिने मूळ मालकाला परत

Spread the love

औरंगाबाद – आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रामाणिकपणे जगणारे नागरिक आसपास वावरंत असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेने समाजात चांगुलपणा टिकून आहे.असे म्हटल्यास वावगू ठरु नये.
१६ जुलै २०२०रोजी मिलींद नाईक या हर्सूल परिसरात राहणार्‍या नागरिकाला राहात असलेल्या सनराईज अपार्टमेंट परिसरात ७तोळ्याचे दागिन्याची गाठोडी सापडली. नाईक हे वाळूज औद्यौगिक परिसरातील बाळकृष्ण टायर्स कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात.नाईक यांनी ते दागिने हर्सूल पोलिसांच्या हवाली केले.

दरम्यान पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी हर्सूल परिसरात दागिने सापडल्याची माहिती कळवली होती.दरम्यान पिसादेवी रोडवर राहणार्‍या योगिता पठाडे यांचे ते दागिने असल्याची खात्री झाली. पठाडे यांच्याकडील दागिन्याच्या पावत्या बघून त्यांना उपायुक्त डाॅ. राहूल खाडे यांच्या हस्ते ते पठाडेंना परंत करण्यात आले. व मिलींद नाईक यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. लाॅकडाऊन तीन सुरु असतांना योगिता पठाडे यांनी त्यांचे दागिने हर्सूल मधे राहात असलेले पठाडे यांचे बंधू औताडे यांच्याकडे ठेवण्यासाठी मुलासोबंत पाठवले होते. मुलगा मोटरसायकलवर औताडे कडे जातांना सनराईज अपार्टमेंट मधे राहात असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी थांबला त्यावेळेस डिक्कीत आईने ठेवलेले दागिने खाली पडले.हा प्रकार मुलाने आईला सांगण्याचे टाळले. त्यानंतर राखी पोर्णिमेला योगिता पठाडे भाऊ औताडे यांच्याकडे आल्या व मुलाने ठेवलेले दागिने परत द्या असे म्हणाल्या औताडेंनी दागिने ठेवलेच नसल्याचे सांगितले. तेंव्हा यौगिता पठाडेंनी मुलाला खडसावून विचारताच त्याने दागिने डिक्कीतून पडल्याचे सांगितले. हा प्रकार पोलिसांच्या कानावर घालण्यासाठी यौगिता औताडे यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दागिन्यांच्या पावत्या पाहून पठाडे यांना दागिने परंत केले. या वेळी पठाडे यांनी नाईक आणि पोलिसांचे मनापासून आभार मानले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!