Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate :चिंताजनक : दिवसभरात 466 नवे रुग्ण , 9 रुग्णांचा मृत्यू , एकूण रुग्णांची संख्या 25 हजारच्या दिशेने….

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्याची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत असून जिल्ह्यात आज  दिवसभरात एकूण 466 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24480 झाली आहे. गेल्या २४ तासात ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण  मृत्यूंची संख्या 725 झाली आहे. दरम्यान आज 154 जणांना (मनपा 73, ग्रामीण 81) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 18929 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर सध्या एकूण 4826 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादच्या ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील आजचा कोरोनाबाधितांचा आकडा 158इतका आहे.


आज सकाळी जिल्हा प्रशासनाने कोरोनाग्रस्तांची  कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही . आज रात्री दिलेल्या माहितीनुसार अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 76, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 84 आणि ग्रामीण भागात 42 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (158)
टिळक नगर, सिल्लोड (1), रांजणगाव शेणपूजी (1), लाडसावंगी (1), वाघाळा, वैजापूर (1), वाळूज (2), सखाराम पंत नगर, गंगापूर (2), कायगाव, गंगापूर (1), बगडी, गंगापूर (2), भवानी नगर, गंगापूर (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (2), जाधव गल्ली, गंगापूर (2), लासूर नाका, गंगापूर (1), अहिल्यादेवी नगर, गंगापूर (1), नवाबपूर, गंगापूर (1), विटावा, गंगापूर (1), भेंडाळा, गंगापूर (1), रांजणगाव (2), वैजापूर मार्केट यार्ड (1), काळभैरव नाथ मंदिर परिसर, नाथ गल्ली, पैठण (1), चिंचोली गल्ली, बोरगाव (1), कन्नड (1), शिवराई,गंगापूर (2) वडगाव (1), बजाज नगर (6), समता नगर, गंगापूर (1), गल्ले बोरगाव (2), अंबेवाडी (1), शासकीय दूध डेअरी जवळ, खंडाळा रोड (1), सिडको महानगर एक (1), चित्तेगाव (1), शेवगाव (1), वानेगाव, फुलंब्री (1), गंगापूर जहांगीर (1), साऊथ सिटी सिडको (1), वाळूज महानगर दोन (3), वाघेरा, मदनी, सिल्लोड (1), अन्य (2) बालानगर, पैठण (1), नगरदेवळा, पाचोरा (1), लुमा नगर, पैठण (1), लासूर स्टेशन (3), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (2), अयोध्या नगर, वडगाव (1), गंगा कॉलनी, वाळूज (6), अज्वा नगर, वाळूज (3), सिडको बजाज नगर (2), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (1), धनश्री सो., बजाज नगर (1), मोहटादेवी मंदिर परिसर, बजाज नगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), राजुरा तुर्काबाद, खर्डी, गंगापूर (1), कन्नड पोलिस स्टेशन परिसर (1), पोलिस क्वार्टर परिसर, कन्नड (2), पिशोर, कन्नड (1), नाथ विहार, पैठण (1), भवानी नगर, मुद्दलवाडी, पैठण (4), लक्ष्मी नगर, पैठण (1), इंदिरा नगर, पैठण (4), नवीन कावसान, पैठण (2), संत नगर, पैठण (1), गांगलवाडी, पैठण (1), भवानी नगर, पैठण (1), शशी विहार, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (2), नारळा, पैठण (1), भराडी पेट्रोलपंपाजवळ, सिल्लोड (1), शांती नगर, कन्नड (2), समता कॉलनी, कन्नड (2), अंधानेर, कन्नड (1), शेवाळे वस्ती, बोरसर (5), बोरसर शाळेजवळ (3), औरंगाबाद (14), फुलंब्री (5), गंगापूर (12), खुलताबाद (1), सिल्लोड (4), वैजापूर (3), पैठण (4)

मनपा (148)
विद्युत कॉलनी, बेगमपुरा (1), सावित्री फुले नगर (1), भारत नगर (1), सावंगी हर्सूल, टी पॉईंट जवळ (1), सौजन्य नगर (1), एन अकरा मयूर नगर (3), साई नगर सातारा परिसर (1), रेणुका माता मंदिर परिसर, सातारा परिसर (1), श्रीसंत जनाबाई नगर (1), संभाजी कॉलनी (3), शास्त्री नगर, हेडगेवार रुग्णालया जवळ (1), टाऊन सेंटर, सिडको (1), एन एक, सिडको (1), महेश नगर (8), अहिंसा नगर (1), संघर्ष नगर (2), राजा बाजार, कुंवरफल्ली (2), विद्यानिकेतन कॉलनी (2), एमआयटी कॉलेज परिसर (1), शंकर चेस्ट हॉस्पिटल परिसर (1), उल्का नगरी (1), राजे संभाजी कॉलनी, जाधववाडी (1), राधास्वामी कॉलनी (1), ईडन गार्डन परिसर, एन दोन, सिडको (1), होनाजी नगर (1) द्वारका नगर (1), पाण्याच्या टाकी जवळ, वायएसके रुग्णालय परिसर (1), बजाज नगर (1), देवानगरी (1), रेहमानिया मस्जिद परिसर (1), बिजली नगर (3), शहानूरवाडी (1), सह्याद्री हिल्स (1), दशमेश नगर (1), नक्षत्रवाडी (4), विश्वभारती कॉलनी (1), स्टेशन रोड, वेदांत नगर (3), स्वामी विवेकानंद नगर (1), सातारा परिसर, मराठी शाळे जवळ (1), एन्डोवर्ल्ड रुग्णालय परिसर (1), ग्रीन सो., बीड बायपास (1), बन्सीलाल नगर (3), भवानी पेट्रोल पंप परिसर (1), समर्थ संकुल परिसर (1), महालक्ष्मी चौक, शनी मंदिर परिसर (1), ठाकूर नगर (1), अन्य (14), मथुरा नगर (1), सिडको (1), बीड बायपास रोड (1), शिवशंकर कॉलनी (1), सिडको (1), जय भवानी नगर (1), एसटी कॉलनी (1), सूर्या लॉन्सच्या मागे (2), एन चार सिडको (1), मिल कॉर्नर (2), गांधी नगर (3), संतोषी माता नगर, एन दोन सिडको (1), ठाकरे नगर, एन दोन सिडको (1), छत्रपती नगर, हर्सूल (1), एन तीन सिडको (3), एन नऊ (2), उल्कानगरी (2), राजधानी नगर, पडेगाव (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (3), आदिनाथ नगर, गारखेडा (1), यशवंत नगर, बीड बायपास (1), शहानूरवाडी (1), एन सात (1), आनंद नगर (1), एन सहा, साई नगर (3), एन दोन, हडको (1), जैन भवन इमारत परिसर (1), हरी कृष्ण नगर, बीड बायपास (1), एन एक, सिडको (1), कलासगर, एमआयडीसी परिसर (2), राम नगर एन दोन (1), सिडको (1), शिवाजी नगर (1), एसबीआय बँके जवळ, समर्थ नगर (1), एन चार सिडको (1), आलमगीर कॉलनी (1) घाटी परिसर (1), शिवनेरी कॉलनी (1), पीर बाजार (1), जनकपुरी कॉलनी (3), हर्सुल (1), नारेगाव (4), जाधववाडी (1), शिवशक्ती कॉलनी, जालना रोड (2), सुराणा नगर, जालना रोड (1), विष्णू नगर (1)

सिटी एन्ट्री पॉईंट (76)
नारेगाव (3), जवाहर कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), जय भवानी नगर (2), एन-9, सिडको (1), एन -6, साईनगर (1), हर्सूल (3), एन-10, पोलिस कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), एन-2,राम नगर (2), हमालवाडा (1), सातारा परिसर (1) बीड बायपास (2), कारकीन, पैठण (1), पांनदरीबा, केळीबाजार (1), माळीवाडा (2), चितेपिंपळगाव (1), एन-एक,सिडको (8), एन-7, सिडको (1), एन-6, सिडको (3), चिकलठाणा (2), जय भवानी नगर (1), देवळाई (1), एसटी कॉलनी (1), प्रकाश नगर (1), केनेवाडी (1), छत्रपती सभागृह हर्सुल (2), अंबिका नगर हर्सुल (2), जाधववाडी (2), जालान नगर (1), राधास्वामी कॉलनी (1), मयूर पार्क (2), बेगमपुरा (1), एन अकरा, दीप नगर (2), हर्सुल कारागृह निवासस्थान परिसर (1) त्रिमूर्ती नगर, पिसादेवी (1), हर्ष नगर (1), राजा बाजार (1), सफया नगर (1), बिडकीन पैठण (1), अंबर हिल (1), वडगाव (1),नायगाव,वाळूज (1), सिडको महानगर (1), तिसगाव (1), वाळूज (2), बजाज नगर (3), साजापूर (1),रांजणगाव (1),राजनगर,मुकुंदवाडी (1)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सिल्लोड तालुक्यातील 48 वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील असेगावातील 33 वर्षीय पुरूष, एन नऊ सिडकोतील 67 वर्षीय स्त्री, गंगापुरातील 61 वर्षीय पुरूष, हिमायत बाग परिसरातील 28 वर्षीय पुरूष , अंधानेर कन्नडमधील 45 वर्षीय पुरूष, इंदिरा नगर, गारखेडा परिसरातील 49 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात टाकळी राजा, खुलताबाद येथील 50 वर्षीय स्त्री, अंधानेर कन्नडमधील 87 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!