Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मध्य रेल्वे महाराष्ट्रात आंतरजिल्हा रेल्वे सुरु करणार , उद्यापासून सुरु होते आहे बुकिंग…

Spread the love

मध्य रेल्वे व्यवस्थापनाने  राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तसे राज्य सरकारला कळवण्यात आले आहे. उद्या २ सप्टेंबरपासून रेल्वेचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. तशी घोषणाच मध्य रेल्वेने आज केली आहे. याबाबतचं एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात अनलॉक-४ जाहीर करतानाच गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्याला अनुसरून मध्य रेल्वेने आज एका पत्राद्वारे राज्य सरकारला महत्त्वाची माहिती दिली आहे.

मध्य रेल्वेनेने जरी केलेल्या पात्रात म्हटले आहे कि , सरकारने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा दिली असल्याने रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक आम्ही सुरू करत आहोत. त्यासाठी प्रवासी आरक्षण सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे. दि . २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाचे बुकिंग प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर करता यईल. मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डी. वाय. नाईक यांनी याबाबतचं पत्र राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर आणि परिवहन सचिव अशोक कुमार सिंग यांना पाठवलं आहे. मात्र या प्रवासी वाहतुकीचे नियम काय असतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान मुंबई लोकलसेवा मार्च  महिन्यांपासून बंद आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल धावत आहेत. त्यामुळे अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. लोकलसेवा सुरू करण्यासाठी नालासोपारा येथे प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून आंदोलनही केले. मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारची परवानगी मिळाल्यास लोकलसेवा सुरू करण्यास आम्ही तयार आहोत, असे स्पष्टही केले होते. मात्र मुंबई मेट्रो आणि मुंबईतील लोकलसेवेबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे रेल्वेने या पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे.  देशभरामध्ये मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाल्यानंतर प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. लॉकडाउनदरम्यान परराज्यातील कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या. दुसरीकडे मुंबईतील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेष मर्यादित लोकल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. मुंबई लोकलबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यादरम्यान मध्य रेल्वेने परिपत्रक प्रसिद्ध करत आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे.केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे सुरू करण्यास मुभा दिली असली तरी राज्यात आणखी महिनाभर तरी मेट्रो बंदच राहील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!