Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LaturNewsUpdate : राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन जाणून घेतली वस्तुस्थिती

Spread the love

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे संजीवन समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने त्यांच्या अहमदपुरच्या भक्तिस्थळ भागात हजारो लोक जमा झाले होते. अहमदपुर येथील मठाच्या 50 कोटी रूपयाच्या संपत्तीच्या वादातून हि अफवा पसरविण्यात आल्याचे सांगण्यात येत असून फवा पसरवणारे कोण आहेत याचा तपास पोलिस करत आहेत अशी  माहिती या  लातुरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे.

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्यावर नांदेड येथे उपचार चालू असून  या वादाच्या पार्श्वभूमीवर एका शासकीय पथकाने त्यांची भेट घेऊन सर्व माहिती घेतली. या पथकात लातुरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत ,नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ बिपिन इटनकर,नांदेडचे पोलिस अधीक्षक यांचा समावेश होता. ही संपूर्ण चर्चा इन कॅमेरा घेण्यात आली आहे. त्यात महाराजांनी स्पष्ट केले आहे की, विद्यमान नूतन ट्रस्टी हे मी स्वत: नेमले आहेत. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. अहमदपुर आणि हाडोळती येथील मठावर परवाच नेमलेले उत्तराधिकारी असतील. मुख्य बाब म्हणजे मठाच्या आणि ट्रस्ट च्या बाबतीत कोणत्याही पक्ष आणि संघटनेच्या हस्तक्षेप नको आहे.याच बरोबर ही सर्व माहिती राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणी बोर्डावर लावण्यात यावी. माझ्या समाधीची खोटी माहिती कोणी दिली आहे? मला माहित नाही त्याचा योग्य तो तपासा करावा.

दरम्यान राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यानी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मानणाऱ्या भक्त संप्रदायात त्याची काय मते आहेत ती पोहचली आहेत. यामुळे पुढील काळात कलह होणार नाहीत. सध्या राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्यावर नांदेड येथे उपाचार सुरु आहे. महाराजांची प्रकृती खालावली असली तरी सध्या ते उपचारांना साथ देत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!