Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबईत भरधाव कारच्या धडकेने ४ ठार , ४ जखमी

Spread the love

मुंबईच्या  क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलच्या जवळ एका सुसाट कारने ८ जणांना चिरडलं आहे. यातील चार  जणांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण  जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ वाजून १५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून वेगात एक गाडी आली आणि तिने हॉटेलसमोर उभा असलेल्या 8 जणांना उडवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!