Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : एका नजरेत जाणून घ्या , महाराष्ट्रात काय चालू काय बंद ?

Spread the love

कोरोना लॉकडाऊन आणि अनलॉकबाबतचे आपले नियम काल केंद्राने जाहीर केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नियम जारी केले आहेत. या नव्या नियमानुसार राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी  मोठ्या प्रमाणात उठविण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने “मिशन बिगेन अगेन” अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.

महाराष्ट्र  सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र जिम, मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान नवे नियम जारी करताना राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.

राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी राज्य सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्यामुळे लोकांना आता आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. याशिवाय खासगी आणि मिनी बसेसनाही  परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंदिरं आणि जिम यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आलेली नाही. जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत आणि कोणत्या बंद राहणार आहेत.

या गोष्टींना सरकारची परवानगी 

हॉटेल आणि लॉज यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी : हॉटेल व्यावसायिकांना दिलासा

खासगी कार्यालय क्षमतेच्या ३० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरु करु शकतात.

प्रवासी तसंच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द. प्रवासासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज २०० उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून १०० विमाने जाणार व १०० येणार. यापूर्वी आतापर्यंत करोना संकटामुळे हा आकडा ५०-५० असा होता.

खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी

या गोष्टी ३० सप्टेंबरपर्यंत बंदच…

शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम

केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांचा अपवाद वगळता आंतररराष्ट्रीय प्रवासाला बंदी.  

मुंबईतील लोकल आणि मेट्रो बंदच राहणार

सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम

सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणं बंधनकारक आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये आधीच्याच नियमांनुसार निर्बंध कायम राहतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!