Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने केला सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Spread the love

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुखर्जी हे भारतीय राजकारणातले अनुभवी नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवरचा भारताचा तिरंगा झेंडा हा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच या काळात कोणत्याही पद्धतीचे शासकीय मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचं पार्थिव हे राहत्या घरी आणलं जाईल. यानंतर काही काळासाठी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सध्या करोनामुळे निर्माण झालेलं वातावरण लक्षात घेता सर्व नियमांचं पालन करुन शासकीय इतमामात मुखर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिल्यानंतर राजकीय, क्रिडा, मनोरंजन सृष्टीतील मान्यवरांनी प्रणव मुखर्जींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी फेसबुकवरुन एक जुना फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या फोटोमध्ये मोदी प्रणव मुखर्जींच्या पाया पडताना दिसत आहेत.  “प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण देशाला दु:ख झालं असून त्यांनी आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी केलेल्या कार्यातून स्वत:ची छाप सोडली. राजकीय अभ्यासक्रम आणि समाजातील सर्व घटकांनी वेळोवेळी प्रणव मुखर्जींच्या कार्याची दखल घे त्यांची प्रशंसा केली,” अशा शब्दांमध्ये मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये मोदी यांनी पुढे म्हटले आहे कि , “२०१४ साली मी दिल्लीत नवीन होतो. पहिल्या दिवसापासूनच मला प्रणव मुखर्जी यांचे मार्गदर्शन, पाठिंबा आणि आशिर्वाद मिळाले म्हणून स्वत:ला भाग्यवान समतो. त्यांच्याबरोबर झालेला प्रत्येक संवाद कायम माझ्या आठवणीत राहिल. माझ्या सद्भावना त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, हितचिंतक आणि देशभरातील समर्थकांबरोबर आहेत,” असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

India grieves the passing away of Shri Pranab Mukherjee. He has left an indelible mark on the development trajectory of…

Posted by Narendra Modi on Monday, August 31, 2020

प्रणव मुखर्जींची राजकीय प्रवास

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.  २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!