IndiaNewsUpdate : रिलायन्सचा बोलबाला ,  बिग बाजार, ईझीडे आणि FBB  चे   १८०० हून अधिक स्टोअर आता रिलायन्सच्या मालकीचे

Advertisements
Advertisements
Spread the love

फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्सने २४,७१३ कोटींच्या डीलवर शिक्कामोर्तब केल्यामुळे रिलायन्स ग्रुप ऑफ इंस्ट्रीजचा भाग असलेल्या  रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आर आर व्ही एल कंपीनने फ्युचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय तसेच लॉजिट्स्टिक्स आणि वेअरहाउसिंग व्यवसाय विकतघेतला असल्याची माहिती कंपनीने शनिवारी पत्रक प्रसिद्ध करून दिली आहे. त्यानुसार देशातील ४२० शहरांमध्ये पसरलेले  बिग बाजार, ईझीडे आणि FBB  चे   १८०० हून अधिक स्टोअर रिलायन्सच्या मालकीचे होणार आहेत

Advertisements

दरम्यान या डीलनुसार फ्यूचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येईल. आरआरएफएलएलच्या विलिनीकरणानंतर आरआरएफएलएल फ्यूचर एंटरप्राइजेस लिमिटेडमध्येही गुंतवणूक करेल. तर रिलायन्स १२०० कोटींची प्रेफरेंन्शियल इश्युद्वारे गुंतवणूक करेल आणि फ्यूचर एन्टरप्रायजेस लिमिटेडमधील ६.०९ टक्के हिस्सा खरेदी करेल. रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी डीलनंतर माहिती दिली. छोट्या व्यापाऱ्यांसह सक्रिय सहकार्याच्या अनोख्या मॉडेलने रिटेल उद्योगाच्या विकासाची गती सुरू ठेवू, अशी आम्हाला आशा आहे. देशभरातील ग्राहक आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं ईशा अंबांनी म्हणाल्या. रिटेल आणि घाऊक उपक्रमाची संपूर्ण मालकी सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाइल लिमिटेडकडे (RRFLL) हस्तांतरित करण्यात येत आहे. लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग समावेश RRVL कडे वर्ग करण्यात येत आहेत. अधिग्रहाणचा भाग म्हणून, फ्यूचर ग्रुप काही कंपन्यांना फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (FEL) मध्ये विलीन करेल.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार