Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आईच्या डोळ्यादेखत गेले दोन्हीही तरण्याबांड मुलांचे प्राण….

Spread the love

आईसह  नदीवर मासेमारी करण्यासाठी गेलेले तरुण असलेले दोन सख्खे भाऊ  आईच्या डोळ्यासमोर बुडून मरण पावल्याची ह्रदयद्रावक घटना भिवंडीतील कामवारी नदीत घडली आहे.  मासेमारी करताना सेल्फी काढण्याच्या नादात दोघांचाही प्राण गेला . हे दोघेही भाऊ मुंबईहून भिवंडीतील मिल्लत नगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमधील आपल्या घरी आले होते.  शहबाज अन्सारी (वय-24) आणि शाह आलम अन्सारी (वय-22) अशी मृतांची नावं आहेत.  बुडालेल्या दोन्ही भावांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि ,  शहबाज आणि शाह आलम हे दोघे भाऊ काल (29 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भिवंडी येथील कामवारी नदीत चाविंद्रा पेट्रोल पंपाच्यामागे आपल्या आईसह मासे पकडण्यासाठी आले होते.  मासेमारी करत असताना सेल्फी घेण्याच्या नादात एका भावाचा  पाय घसरुन तो पाण्यात बुडाला. भावाला बुडताना पाहून दुसऱ्याने  देखील त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ दोन्ही सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली. दरम्यान आपल्या डोळ्यासमोर आपली दोन्हीही कर्ती मुलं बुडताना पाहून  आईनं जीवाचा आकांत केला. लोकांच्या मदतीसाठी रस्त्याच्या दिशेने तीने धाव घेतली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

अखेर स्थानिक तरुणांनी तातडीनं पाण्यात उतरुन शोधकार्य सुरू केले. रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी शहबाज आणि आलम याचा मृतदेह बाहेर काढला.या ह्रदयद्रावक  घटनेमुळे मिल्लत नगर भागात शोककळा पसरली आहे. स्थानिक नगरसेवक इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले पण तोपर्यंत सगळे आटोपले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!