Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : Unlock 4 : जाणून घ्या केंद्राच्या मते काय चालू आणि काय बंद ?

Spread the love

 

सध्या देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ३५ लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने शनिवारी जरी केलेल्या अनलॉक – 4 मार्गदर्शक सूचनेनुसार येत्या ७ सप्टेंबरपासून देशभरात मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

थोडक्यात पहा काय सुरु होईल ?

१. दिनांक  ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू केल्या जातील

२. येत्या २१ सप्टेंबरपासून १०० नागरिकांची उपस्थिती असेल असे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करता येतील. अशा कार्यक्रमांमध्ये किंवा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग करणं बधनकाकर असेल

३. ओपन एअर थिएटर २१ सप्टेंबरपासून खुली करण्यास परवानगी आहे

४. २१ सप्टेंबरपासून ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत येण्याची परवानगी

५. २१ सप्टेंबरपासून शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ऐच्छिक आधारावर (कंटेन्मेंट झोन बाहेरील) ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल

६. २१ सप्टेंबरपासून तांत्रिक आणि व्यवसायिक शिक्षण असलेल्या (ज्यासाठी प्रयोगशाळा आवश्यक आहे) उच्च शिक्षण क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था सुरू होतील.

काय सुरु होणार नाही

१.  कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाउन कायम असेल. तिथल्या नियमांमध्ये कुठलेही शिथिलता दिली जाणार नाही. कंटेनमेंट झोनमधील नियम सक्तीने पाळले जातील.

२.  चित्रपटगृह, इंटरनेट पार्क

३. स्विमिंग पूल बंदच राहतील

४. यावेळी सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहतील.

दरम्यान अनलॉक – 4 मध्ये शाळा आणि महाविद्यालये उघडण्याबाबतचे नियमही जाहीर केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा, महाविद्यालये, कोचिंग आणि इतर शैक्षणिक संस्था बंदच राहतील. पण, कंटेन्मेंट झोन बाहेरील शाळांमध्ये इयत्ता ९ वी आणि १२ वीचे विद्यार्थी  शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी स्वेच्छेने शाळेत येऊ शकतात मात्र  पालकांनी परवानगी दिली तरच हे शक्य आहे. तसंच शाळा विद्यार्थ्यांना वर्गात येणं बंधनकारक करून शकत नाहीत. विद्यार्थ्यांना  आणि पालकांना हवं असेल तरच ते शाळेत जाऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांना शाळेत जायचे असेल तरच त्यांनी शाळेत जावे. परंतु  काही मर्यादेनुसारच विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील.  राज्य आणि केंद्र शासित प्रदेश २१ सप्टेंबरपासून ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये जाण्याची परवानगी देऊ शकतात. मात्र हे कर्मचारी  केवळ ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत येऊ शकतात.

राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी सखोल चर्चेनंतर ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था , कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंग शिक्षणास अनुमती आणि प्रोत्साहन दिले जाईल. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण / टेलि-काउन्सिलिंग आणि त्या संबंधित कामांसाठी ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बोलवण्याची परवानगी देऊ शकतात.

७ सप्टेंबरपासून मेट्रोसेवा सुरु

याशिवाय केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक – 4 च्या नियमावलीनुसार महानगरांमधील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होतील. नगरविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मेट्रो सेवा टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. देशातील मेट्रो सेवा २२ मार्च  पासून बंद होती.

कंटेन्मेंट झोन वगळता राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना आता लॉकडाउनचा अधिकार नाही

कंटेन्मेंट झोन वगळता राज्य आणि केंद्र शासित प्रदेश स्थानिक पातळीवर कुठेही (राज्य, जिल्हा, विभाग, शहरं आणि गावं ) लॉकडाउन घोषित करू शकत नाही. राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना लॉकडाऊन घोषित करायचा असल्यास आधी त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी, असं केंद्राने दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. दरम्यान कोरोना संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. दुकानांमध्ये ग्राहकांदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे. मास्क घातलेले पाहिजेत. करोना संबंधी दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही? याची याचे निरीक्षण केंद्र सरकारकडून करण्यात येईल असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांना सशर्त परवानगी

देशात सामाजिक, शैक्षणिक, स्पोर्ट्स, मनोरंज, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि इतर कार्यक्रमांना दि . २१ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. पण अशा कार्यक्रमात १०० हून अधिक व्यक्ती या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नयेत, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर दि . २१ सप्टेंबरपासून खुल्या चित्रपटगृहांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी सध्या असलेली व्यक्तींची मर्यादा दि .  20 सप्टेंबर पर्यंत कायम राहील.

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी , ई-पासची गरज राहणार नाही

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी, ई-पासची गरज राहणार नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्था तसंच आपत्ती व्यवस्थापन हे राज्य सूचीतील विषय असल्याने राज्य सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान  ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र ई पास रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आता राज्याच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!