Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : ५ पोलिसांसह , ३ डॉक्टरांचा मृत्यू , कोकणातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

Spread the love

राज्यात तीन डॉक्टरांसह पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अकोला, बुलडाणा आणि भुसावळमध्ये शुक्रवारी तीन बालरोग तज्ज्ञांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत १५१ पोलिसांना लागण झाली आहे. राज्यात दोन हजार ७७२ अॅक्टिव्ह पोलिस असून त्यातील ३५८ अधिकारी आणि २ हजार ४१४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यात करोनाबाधित पोलिसांमध्ये १५७४ अधिकारी आणि १३ हजार २१८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तीन डॉक्टरांचा मृत्यू

उपलब्ध माहितीनुसार , अकोला जिल्ह्यातील डॉक्टर विवेक फडके (५५) हे गेल्या पाच महिन्यांपासून मुर्तिजापूर कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले असता ४४ तासांतच त्यांचा मृत्यू झाला. तर बुलडाणा जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर गोपाळ क्षीरसागर (३७) यांचेही करोनामुळे निधन झालं आहे. जानेफळ येथे त्यांचं खासगी रुग्णालय होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ५ ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शिवाय भुसावळमध्ये गरीबांचा डॉक्टर म्हणून ख्याती असलेले सुप्रसिद्ध डॉक्टर उमेश मनोहर खानापुरकर यांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाची लागण झाल्याने ११ ऑगस्ट रोजी त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तिन्ही डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली

महाराष्ट्रातील कोरोनाने  मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पोलिसांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत वाढले आहे. राज्यात आत्तापर्यंत ११ हजार ८६७ पोलिसांनी करोनाची लढाई जिंकली आहे. त्यातील १२०१ अधिकारी आणि १० हजार ६६६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, राज्यातील १५३ पोलिसांनी करोनाची झुंज अपयशी ठरली आहे. त्यात १५ अधिकारी आणि १३८ कर्मचारी आहेत.

नागपूमध्ये जुलैच्या मध्यापर्यंत ५ ते १० असताना गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून यामुळे नागपूरकरांमध्ये मोठी चिंता आहे. शनिवारी दिवसभरात यात आणखी नव्या ९२१ जणांची भर पडली तर उपचारादरम्यान ३३ बाधितांनी अखेरचा श्वास मोजला. त्यामुळे आतापर्यंत करोनाच्या प्रादुर्भावाचा आकडा आता २७ हजारापुढे १७ वर थांबला. तर आजवर करोनाची बाधा होऊन मरण पावलेल्यांची संख्या आता ९७९ वर गेली.

राज्याची स्थिती चिंताजनक

राज्यात गेल्या २४ तासांत २९६ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा २४ हजार ३९९ वर पोहचला आहे. राज्यात आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात ७ हजार ६९० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.०४ टक्क्यांवर पोहचले आहे

राज्यात करोनाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही करोना संसर्गाचा जोर पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात करोनाने २९६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा २४ हजार ३९९ इतका झाला आहे तर सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४० लाख ८४ हजार ७५४ जणांची करोना चाचणी करण्यात आल्या असून त्यापैकी ७ लाख ८० हजार ६८९ (१९.११ टक्के) इतक्या व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत तर बाकीच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १३ लाख ९ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ३५ हजार ३७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ९३ हजार ५४८ इतकी आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात पुणे जिल्ह्यातील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. पुण्यात सर्वाधिक ५१ हजार ९०९ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात एकूण रुग्णसंख्या १ लाख ७३ हजार १७४ इतकी झाली असून आतापर्यंत १ लाख १७ हजार २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर ४ हजार ६० जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात २० हजार ९७६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईत सध्या २० हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णांच्या  संख्येत मोठी वाढ

मे महिन्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात मुंबई व अन्य भागांतून दोन लाखांहून अधिक संख्येने लोक आले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या कणकवली तालुक्यात आहे. जिल्ह्यातील काही डॉक्टर्स ,परिचारिका यांनाही करोनाने गाठले आहे. काही पोलिसांनाही करोनाची लागण झाली आहे. कणकवलीतील काही दवाखाने बंद आहेत. वैभववाडी बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्यात एकूण १६१ कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. आजवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२६५ एवढी झाली असून एकूण १९ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. करोना रुग्णसंख्येत रोज नव्याने भर पडत आहे. आज उच्चांकी म्हणजेच १५६ रुग्ण आढळून आले आले. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!