Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : तीन गुन्हे उघडकीस, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंगाबाद – गेल्या दोन आठवड्यात तीन रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांसहित दोन विधीसंघर्षग्रस्त गुन्हेगारांना पकडून जीन्सी पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणले व १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फारुक अहमर शहा(२१) रा.देवळझरी ता.जाफ्राबाद , सागर कचरु खरात(२०)रा.उस्मानपुरा, सुयोग संतोष जाधव(१९) रा.उल्कानगरी अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील फारुक अहमद ला जालनापोलिसांचा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून तो फक्त घरफोड्या करण्यासाठीच संजयनगरात किरायाने घर करुन राहात असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.तर सागर खरात आणि सोनू जाधव हे उस्मानपुरा पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहेत. वरील तिघांनी ३ ते १८आॅगस्ट दरम्यान विष्णूकांत दरख आणि मुकेश शहा यांचे जुन्या मोंढ्यातील दोन दुकाने फोडली तर आकाशवाणी परिसरातील अल्यूमिनीअम स्टील चे राजेंद्र बुरडक यांचे दुकान फोडून अंदाजे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला होता. एकूण चोरी गेलेल्या ८५टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके, दिनेश सुर्यवंशी,पोलिस कर्मचारी रफी शेख, संपत राठोड, हारुण शेख,संजय गावंडे सुनिल जाधव, गणेश नागरे यांनी पार पाडली.

दुकानाचे शटर फोडणारा अट्टल गुन्हेगार सिटी चौक पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद : शहरात शटर उचकटून चोरी करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. लेबर कॉलनीतील मेडिकल दुकानाचे शटर उचकटून साहित्य व रोख लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या सिटी चौक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अनिस उर्फ बाबा खलील खान (रा. लाल मजीद जवळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून अन्य भागातही शटर फोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्टच्या मध्यरात्री लेबर कॉलनी येथील मेडिकल स्टोअरचे शटर वाजल्याचा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला जाग आली. बाहेर येऊन पाहिले असता दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ मेडिकल मालक शेख नाविद शेख मसूद (रा. गणेश कॉलनी) यांना फोनवर माहिती दिली. नाविद यांनी येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सिटी चौक पोलिसांना माहिती कळविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन व डीबी प्रमुख उपनिरीक्षक पाथरकर हे टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूला चोराचा शोध सुरू केला. तेव्हा फाजलपुऱ्याच्या नाल्याच्या परिसरात नागरिकांचा चोर चोर आवाज आल्याने पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तेव्हा अनिस पिशवी घेऊन पळताना दिसला. त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी मदरशाला मदत निधीसाठीचे दोन गल्ले व मेडिकल मधून लुटलेला ऐवज व रोख असा २१ हजार ७५९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याने जिन्सी, सिटी चौक, बेगमपुरा व हर्सूल भागात दुकानाचे शटर फोडून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संग्रहित सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याने गणेश कॉलनीतून दुचाकी चोरी व हर्सूल येथील दुकाने फोडताना दिसून आला. त्यामुळे आणखी दुचाकी व शटर फोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन सय्यद, डिबी पथक प्रमुख प्रवीण पाथरकर, आप्पासाहेब देशमुख, संजय नंद, संदीप तायडे, बालाजी तोटेवाड, माजेद पटेल, अशोक कदम, बिट मार्शल भोटकर यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!