Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : उच्चशिक्षण मंत्री म्हणतात , परीक्षा तर होणारच !! पण केंव्हा ते सोमवारी १२ वाजता सांगू…

Spread the love

राज्यातील विविध विद्यापीठात अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तर होणारच पण केंव्हा याबाबतचा पहिला निर्णय सोमवारी १२ वाजेपर्यंत  घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का ? याचा निर्णय घेण्यासाठी , मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्याच्या उद्या ही समिती कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर माजी कुलगुरुंसोबतही संवाद साधला जाणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अतिशय सोप्या पद्धतीने  या परीक्षा घेण्याच्या  सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे सांगून सामंत म्हणाले कि , शिवाय विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्याबाबतही आम्ही विचार करीत असून . विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल असे कुणीही राजकारण करु नये  असे आवाहनही सामंत यांनी केले  आहे.

दरम्यान विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत मात्र परीक्षेची तारीख ठरविण्यासाठी किंवा परीक्षा रद्द करण्यासाठी यूजीसीशी संपर्क साधण्याचे आदेश सर्वोच्च निर्णयाने दिला आहे त्यानुसार राज्य शासनाने कार्यवाही सुरु केली आहे. आज उदय सामंत यांनी राज्यातील कुलगुरूंशी प्राथमिक चर्चा करून पुन्हा अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!