Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : गेल्या २४ तासात राज्यभरात आणखी ३४६ पोलीस करोनाबाधित

Spread the love

देशातील करोनाबाधितांची संख्या आता ३३ लाखांपेक्षाही पुढे गेली असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यभरात आणखी ३४६ पोलीस करोनाबाधित आढळले असून, दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १४ हजार ६४१ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ७४१ जण, करोनामुक्त झालेले ११ हजार ७५२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १४८ जणांचा समावेश आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

उपलब्ध माहितीनुसार राज्यातील १४ हजार ६४१ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५५५ अधिकारी व १३ हजार ८६ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ७४१ पोलिसांमध्ये ३५३ अधिकारी व २ हजार ३८८ कर्मचारी आहेत. करोनामुक्त झालेल्या ११ हजार ७५२ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार १८७ व १० हजार ५६५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १४८ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देशात मागील दोन दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्त संख्येने वाढत असल्याचे दिसत आहे.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार ५०१ इतकी झाली आहे. मागील २४ ताासंत ७७ हजार २६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!