Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InternationalNewsUpdate : मोठी बातमी : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

Spread the love

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आरोग्याच्या कारणामुळे पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडणं शक्य नसल्याचे  सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना शिंजो आबे भावूक झाले. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. त्याचबरोबर “मी ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला प्रचंड वेदना होत आहेत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपासून  जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दिवसोंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही वृत्त होतं. अखेर आज शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. दीर्घ आजारानं त्रस्त असलेले शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना भावूक झाले. “दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. कारण मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला वेदना होत आहेत,” अशा भावना आबे यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान मागील काही दिवसांपासून आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट दिल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा सुरु झाली होती. मागील बऱ्याच काळापासून आबे यांना आतड्याच्या सुजेने होणाऱ्या अल्सरचा त्रास आहे. जपानचे अर्थमंत्री तारो असो, माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा, परराष्ट्र मंत्रीपदी काम केलेले फुमिओ किशिदा, संरक्षणमंत्री तारो कोनो यांच्या नावांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!