Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात , चोरट्यांच्या तावडीतून चोरीच्या सहा दुचाकी जप्त

Spread the love

औरंंंगाबाद : शहर परिसरात दुचाकी चोरी आणि दुकानाचे शटर उचकटून धुमाकुळ घालणा-या दोन अट्टल चोरट्यांना पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून जवळपास २ लाख रूपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मंगळवारी (दि.२५) कळविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भिमराव शिंदे ( वय.१९, रा.गौतमनगर), गजानन सुभाष मकळे ( वय २०, रा.मुकुंदनगर नगर, मुकुंदवाडी  परिसर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. विविध भागात दुचाकी चोरी करणारे तसेच दुकानाचे शटर उचकटून चोरी करणारे दोघे मुकुंदवाडी  परिसरात आले असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळोंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, दादाराव पवार, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, राजेश यदमळ, रवि जाधव, दिपक जाधव, कल्याण निकम, जालिंदर मांन्टे, विलास डोईफोडे, एस.पी.ओ.संतोष बोधक आदींनी चोरट्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, दोघांनी बीड बायपास रोडवर तसेच मुवुंâदवाडी परिसरात तीन ते चार दुकानाचे शटर उचकटून चोरी केली असल्याची कबूली दिली. तसेच त्यांचा एक साथीदार फरार असल्याचे पोलिसांना सांगितले.

प्राध्यापकाचे फोडून तीन तोळ्याचे दागीने लंपास

औरंंंगाबाद : सरस्वती भवन महाविद्यालयातील प्राध्यापकाचे भरदिवसा घर फोडून चोरांनी तीन तोळ्यांचे दागिने लंपास केले. सुदैवाने कपाटात असलेले आणखी तीन तोळे सोन्याचे दागिने चोरांच्या हाती लागले नाही. या चोरांनी कपाटात असलेल्या रकमेलाही हात लावला नाही. ही घटना अवघ्या दीड तासात रविवारी दुपारी साडेतीन ते पाचच्या दरम्यान घडली. धनराज प्रभाकर कांबळे (वय ४३, रा. रेणुका हाऊसिंग सोसायटी, हनुमान टेकडीजवळ, पहाडसिंगपुरा) हे सरस्वती भवन महाविद्यालयात केमेस्ट्रीचे प्राध्यापक आहेत. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ते सहकुटुंब नंदनवन कॉलनी येथे सासरवाडीत गेले होते. यानंतर संधी साधून चोरांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पुढे कपाट फोडून त्यातील तीन तोळ्यांचे दागिने हस्तगत केले. सुदैवाने यावेळी कपाटात असलेले आणखी तीन तोळ्याचे दागिने चोरांच्या हाती लागले नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास धनराज कांबळे कुटुंबिय घरी पोहोचले. तेव्हा घरफोडी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धनराज कांबळे यांच्या तक्रारीवरुन चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करत आहेत.

सहा तोळ्यांचे दागिने चोरणारा तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

औरंंंगाबाद : घरातील सामान शिफ्ट करीत असताना जवळपास २ लाख ४७ हजार रुपये किमतीचे  सहा तोळ्यांचे दागिने चोरून नेणाNया कामगारास सिडको पोलिसांनी अवघ्या तासाभरात ताब्यात घेतले. अजिम खान मोबीन खान पठाण (वय ३९, रा.उंडणगाव, ता.सिल्लोड, ह.मु.कटकट गेट परिसर) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्या कामगाराचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी कळविले आहे. सिडको एन-८ परिसरातील यशश्री हौसींग सोसायटी येथील रहिवासी गजानन चंद्रकांतराव लोमटे यांनी बीड बायपास रोडवरील मयूरनगर येथे फ्लॅट घेतला असून नवीन घरी सामान शिफ्ट करण्यासाठी त्यांनी आझाद चौकातून एक लोडींग गाडी व तीन कामगारांना बोलावून घेतले होते. घरातील सामान शिफ्ट करीत असताना अजिम खान पठाण याने गजानन लोमटे यांच्या नकळत घरातून २ लाख ४७ हजार रुपये विंâमतीचे सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले होते.

शहरभर चोरट्यांचा धुमाकुळ, विविध भागात ७ दुकाने फोडली

औरंंंगाबाद : शहरभर चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहराच्या विविध भागात जवळपास ७ दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी लाखो रूपये विंâमतीचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे पोलिसांच्या गस्तीवरच व्यापारी वर्गातून संशय व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी हर्सूल परिसरातील पाच दुकाने फोडली. त्यामध्ये शुभम काशीनाथ निकम (रा.राधास्वामी कॉलनी) यांचे धनश्री मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी १३ हजार रूपये विंâमतीचे तीन मोबाईल चोरून नेले. तसेच संजय साहेबराव साळुंके यांचे माऊली कलेक्शन, अंबरहिल येथील अंबर मेडीकल स्टोअर्स, काशीद टायर पंक्चरचे दुकान, किशोर हार्डवेअर, हर्सूल गावातील पौर्णिमा फोटो स्टुडीओ दुकानाचे शटर उचकटून ऐवज चोरून नेला. तसेच मुकुंदवाडी परिसरातील दिशा अपार्टमेंन्टमध्ये असलेले गुरूदत्त स्टेशनर्स आणि जनरल स्टोअर्स आणि एका पोळीभाजी वेंâद्राचे शटर चोरट्यांनी उचकटले. शहराच्या विविध भागात दुकानाचे शटर उचकटून चोरी करणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे हर्सूल पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मुकुंदवाडी   पोलिस ठाण्यात २ गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!