Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : गावठी पिस्तुल बाळगणारे दोघे चिकलठाणा पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

औरंंंगाबाद : शहर आणि परिसरात दहशत पसरविण्यासाठी गावठी पिस्तुुल आणि चावूâ घेऊन येणाNया दोघांना चिकलठाणा पोलिसांनी रविवारी मध्यरात्री पाठलाग करून गजाआड केले. त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तुल, काडतूस, चाकू आणि बुलेट जप्त करण्यात आली आहे. राहुल बाळासाहेब सोनवणे (वय २९) रा. गोकुळनगर सुरेवाडी, गणेश हरिभाऊ फुले  (वय ३०) रा. हर्सूल अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना बुलेटवरून दोन जण शहरात गावठी पिस्तुल आणि धारदार चावूâ घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अधारे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, दिपक सुरोशे, मलखानसिंग नागलोत यांच्या पथकाने बीड बायपास रस्त्यावरील झाल्टा फाट्यावर सापळा रचला. पथकला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सुसाट वेगात आलेल्या बुलेट क्रमांक (एमएच २० डी. के. ४७७७) चालकास थांबण्याचा इशारा केला. त्याने बुलेटचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता या पथकाने पाठलाग करून त्या बुलेटचालकास पकडले.

पोलिसांनी बुलेटचालक राहुल सोनवणे, गणेश पुâले यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळून ९ एमएमची गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस, धारदार चाकू आणि बुलेट, मोबाईल असा १ लाख ४६ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राहुल सोनवणे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!