Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SushantsingRajputDeathCase : सीबीआयचा तपास अधिक गतीने सुरु , जाणून घ्या प्राथमिक तपास

Spread the love

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने हस्तक्षेप केल्यानंतर अधिक गतीने तपास  सुरू झाला आहे.पो सीबीआय सूत्रांच्या मते, घटनास्थळी केलेल्या सीन रिक्रेएशनमधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांतच्या खोलीत इतर कोणत्याही मार्गातून आतमध्ये येऊ शकत नव्हत अशी माहिती आहे. त्यानुसार सुशांतने ज्या खोलीमध्ये आत्महत्या केली होती त्या खोलीची उंची १२ फूट आहे, सुशा्ंतची उंची ५.९ फूट होती तर त्याच्या पलंगाची उंची ४ फूट. सीबीआयच्या मते हे रिक्रिएशन केल्यानंतर प्राथमिक निरिक्षणात हे प्रकरणा आत्महत्या वाटत आहे.मात्र सीबीआय प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करीत आहे.

दरम्यान सीबीआयच्या सूत्रांच्या मते, सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या खोलीाचा दरवाजा आतून बंद होता आणि त्याच्या खोलीमध्ये कुणीही कोणत्याही मार्गाने आतमध्ये जाऊ शकत नाही. खिडकीतून देखील कुणी येऊ शकत नाही. सीबीआयने या घटनेतील सर्व सीन रिक्रिएट करून पाहिले आहेत.

वांद्रे येथील घरी घटनास्थळी सीबीआयकडून सुशांतच्या आत्महत्येची घटना रिक्रिएट करण्यात आली होती. ही घटना रिक्रिएट करत पुराव्यांशी तपासून पाहण्यात आली. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याने आत्महत्या केली नसल्याचा दावा केला होता. यामध्ये त्याची उंची आणि घराच्या उंचीशी ताळमेळ नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बेडपासून फॅनपर्यंतची उंची सुशांतच्या उंचीच्या जवळपास असल्याने तो आत्महत्या करू शकत नसल्याचा अनेकांचा दावा आहे. सुशांतच्या मृत्यूच्यावेळी उपस्थित चारजणांसोबत सीबीआयने पुन्हा क्राइम सीन रिक्रिएट केला. सुशांत दार उघडत नसल्याने चारही जणांनी काय केलं आदी बाबी पुन्हा रिक्रिएट करण्यात आल्या. यावेळी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी देखील उपस्थित होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!