Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाड इमारत दुर्घटना : १० जणांचा मृत्यू , लहान मुलाला बचाव पथकाने सुरक्षित काढले बाहेर , बिल्डर फरार

Spread the love

महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून लहान मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तब्बल 19 तासांनंतर साडेतीन वर्षांच्या मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढल्यानंतर सगळ्यांचाच चेहऱ्यावर आनंद पसरला , टाळ्यांच्या कडकडाट झाला आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, रायगडमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कालचा 1आणि आज 9  मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान  ढिगाऱ्याखाली १८ते १९ लोक अडकल्याची शक्यता आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. दुर्घटनेप्रकरणी   बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानं इमारत पूर्णपणे ढासळली असून संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधीच दिले होते. दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत सोमवारी संध्याकाळी सात  वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते. त्यापैकी 75 जण सुरक्षित असून अजूनही काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान  एनडीआरएफची टीम  घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

महाड दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्चर, नगरपालिका इंजिनीअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी मडाडयेथून पथक रवाना झालं असल्याचं, माहिती समोर येत आहे. दुर्घटनेला १२ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप बाचवकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली १८ जण असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफच्या तीन पथक घटनास्थळी आहेत. या दुर्घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई तात्काळ देण्यात येईल, असं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!